Mumbai News : मुंबई विमानतळावर DRI ची मोठी कारवाई; विदेशी नागरिकाने गिळल्या होत्या ९.७५ कोटींच्या कॅप्सूल

Mumbai Crime News : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठी कारवाई करत ९.७५ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी ब्राझिलच्या नागरिकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaam Digital
Published On

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठी कारवाई करत ९.७५ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी ब्राझिलच्या नागरिकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे या विदेशी नागरिकांने कोकेनने भरलेल्या ११० कॅप्सुल गिळल्या होत्या. त्याच्याकडून एकूण ९७५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आलं आहे.

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना ब्राझिलची व्यक्ती अमली पदार्थ घेऊन मुंबई विमानतळावर येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांना विमानतळावर तपासणी करत असताना एक व्यक्ती संशयास्पद आढळून आली. अधिकाऱ्यांना लागलीच त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. पण त्याने सुरुवातीला आपल्याकडे अशी कोणतीही वस्तू नाही नसल्याचं सांगितलं. मात्र कसून चौकशी केल्यानंतर त्यांने अमली पदार्थ आणल्याची कबूली दिली.

Mumbai News
पंढरपूर : जीपचा टायर फुटून भीषण अपघात; तीन महिला ठार, नऊ गंभीर जखमी

धक्कादायक म्हणजे त्याने अमली पदार्थाच्या कॅप्सूल गिळल्याची कबूली दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला जेजे रुग्णालयात दाखल केलं आणि शस्त्रक्रीया करून कप्सूल बाहेर काढल्या. ११० कॅप्सूल त्याने पोटात दडवल्या होत्या. हे पाहून अधिकारीही चक्रावले. ९७५ ग्रॅम वजनाच्या या या कॅप्सूलची किंमत जवळपास ९.७५ कोटी आहे. पोलिसांनी हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यामागे अजून कोण कोण सामिल आहेत? कुठे कुठे पाठलं जात होते, याची चौकशी DRI कडून सुरू आहे.

Mumbai News
पंढरपूर : जीपचा टायर फुटून भीषण अपघात; तीन महिला ठार, नऊ गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com