Salman Khan Galaxy Apt Firing: Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Home Firing: सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचा कट पूर्वनियोजितच होता; तपासातून बरेच खुलासे

Salman Khan Home Firing Update: सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार हा एक प्रि प्लॅन कट असल्याचं समोर आल आहे. गोळीबारात हल्लेखोरांकडून वापरलेली बाईक चोरीची असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Chetan Bodke

Salman Khan Home Firing Latest Update

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या काळवीट हत्या प्रकरणामुळे कमालीचा चर्चेत आला आहे. या प्रकरणामुळे अभिनेत्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. १४ एप्रिलला पहाटे ५ वाजता दोन अज्ञात व्यक्तींनी अभिनेत्याच्या घरावर अंदाधुंद गोळीबार केला होता. हा गोळीबार सलमान खानच्या वांद्रातील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दिसणारे दोन हल्लेखोर दिसत आहेत. रस्त्यावरून हल्लेखोरांनी थेट अभिनेत्याच्या घराच्या दुस-या मजल्यावर चार राऊंड फायर केले. दरम्यान, या हल्लेखोरांविषयी आणखी महत्वाची अपडेट समोर आली आहे.

सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार हा एक प्रि प्लॅन कट असल्याचं समोर आल आहे. सुरुवातीला असा कयास बांधला जात होता की गोळीबारात वापरलेली बाईक चोरीची आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाईक विकत घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. रायगडच्या पेण वरून सेकंड हॅन्ड बाईक हल्लेखोरांनी विकत घेतली होती. सध्या पोलिसांकडून या बाईकच्या मूळ मालकाची चौकशी करत आहेत. काल रात्री हल्लेखोऱ्यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते. काल माउंट मेरी चर्च जवळून ती बाईक पोलिसांकडून जप्त करण्यात आली होती. सध्या पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहे.

भाईजानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी क्षणाक्षणाला आपलं वाहन बदलल्याचं नुकतंच पोलिस तपासात स्पष्ट झालं होतं. त्या हल्लेखोरांनी हल्ला करताना वापरलेली बाईक माऊंट मेरी चर्चजवळ सोडली आणि तिथून एक रिक्षा पकडली. त्याचवेळी पोलिसांकडून ही दुचाकी काल माउंट मेरी चर्च जवळून जप्त करण्यात आली होती. हल्लेखोरांनी बाईक माऊंट मेरी चर्चजवळ सोडल्यानंतर त्यांनी वांद्रे स्टेशन गाठले. पुढे ते ट्रेनने सांताक्रुजला आले. सांताक्रुझवरून त्यांनी रिक्षाने वाकोला गाठले. तिथून पुढे हे हल्लेखोर नेमके कुठे गेले. हे मात्र अद्याप पोलिसांना समजू शकलेलं नाही.

रविवारी दुपारी अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबूक अकाउंटवरुन सलमानबद्दल एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्या पोस्टमध्ये बिश्नोई गँगमधील एका सदस्याने या गोळीबाराची जबाबदारी घेतल्याचे स्पष्ट झाले होते. गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटचा आयपी अड्रेस कॅनडामध्ये असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. ते फेसबुक अकाऊंट हल्ल्याच्या काही तासांपूर्वी उघडण्यात आल होतं. सीसीटिव्ही फुटेज आणि मोबाईल सीडीआरच्या माध्यमातून पोलिस संबंधित प्रकरणी सखोल तपास करीत आहेत.

काल सोशल मीडियावर अनमोल बिश्नोईने एक पोस्ट लिहिली होती. “सलमान खान हा फक्त ट्रेलर आहे. कारण तुला आमची ताकद समजायला हवी, म्हणून आम्ही हे केले. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग तुला देत आहोत. यानंतर बंदुकाच्या गोळ्या खाली घरावर नाही चालणार, तर भरलेल्या घरावर चालतील. बाकी मला जास्त बोलायला नाही आवडत...” आणि पोस्टच्या शेवटच्या भागामध्ये लॉरेन्स बिश्नोई ग्रुपचं नाव लिहिलं आहे. त्यासोबतच ग्रुपमधील काही सदस्यांचेही नावं लिहिलेली आहे, ही पोस्ट त्याची सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT