>> सचिन गाड
Salman Khan House Firing
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या काळवीट हत्या प्रकरणामुळे कमालीचा चर्चेत आला आहे. या प्रकरणामुळे अभिनेत्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. १४ एप्रिलला पहाटे ५ वाजता दोन अज्ञात व्यक्तींनी अभिनेत्याच्या घरावर अंदाधुंद गोळीबार केला होता. हा गोळीबार सलमान खानच्या वांद्रातील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर झालेला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दिसणारे दोन हल्लेखोर दिसत आहेत. रस्त्यावरून हल्लेखोरांनी थेट अभिनेत्याच्या घराच्या दुस-या मजल्यावर चार राऊंड फायर केले. दरम्यान, या हल्लेखोरांविषयी आणखी महत्वाची अपडेट समोर आली आहे.
गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांचे फोटोजही काल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या छायाचित्रांच्या आधारे या दोघांचा शोध सुरू करण्यात आला आहे. भाईजानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांनी क्षणाक्षणाला आपलं वाहन बदलल्याचं तपासात उघड झाले आहे. त्या हल्लेखोरांनी हल्ला करताना वापरलेली बाईक माऊंट मेरी चर्चजवळ सोडली आणि तिथून एक रिक्षा पकडली. तिथून ते वांद्रे रेल्वे स्थानकात पोहोचले. रेल्वे स्थानकातही ते दोघे हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. तिथून पुढे ते ट्रेनने सांताक्रुजला आले. सांताक्रुझवरून त्यांनी रिक्षाने वाकोला गाठले. तिथून पुढे हे हल्लेखोर नेमके कुठे गेले. हे मात्र अद्याप पोलिसांना समजू शकलेलं नाही. मुंबई पोलिस सध्या त्या दोघांनाही शोधण्यात व्यग्र आहेत.
नुकत्याच झालेल्या गोळीबारामुळे, सलमान खानच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली आहे. गेल्या वर्षी, लॉरेन्स बिष्णोई गँगकडून येणाऱ्या धमक्यांनंतर सलमानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. मात्र कालच्या गोळीबाराच्या घटनेनंतर सलमानच्या पुन्हा एकदा सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. कालपासून अभिनेत्याच्या घराजवळ मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. अशीच पोलिस सुरक्षा पुढील काही दिवस अभिनेत्याच्या घराजवळ कायम राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
सुदैवाने ह्या गोळीबाराच्या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. घटना घडल्यापासून कोणत्याही अज्ञात व्यक्तीला परिसरात येण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. याआधीही सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिष्णोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हा अभिनेत्याला मुंबई पोलिसांकडून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानावरही लॉरेन्स बिश्नोईने हल्ला केला होता. सलमान खानसोबतच्या जवळच्या संबंधांमुळे हा हल्ला झाल्याचे म्हटले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.