Salman Khan House Firing Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan Firing Case : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; पंजाबमधून आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Salman Khan Fireing Update : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी विकी गुप्ता आणि सागर पाल यांच्यानंतर आणखी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींना गुरूवारी रात्री उशिरा मुंबई क्राईम ब्रँचने मुंबईत आणले आहे.

Chetan Bodke

Salman Khan Firing Case

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर १४ एप्रिलला पहाटे गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराच्या घटनेमध्ये सतत वेगवेगळी माहिती समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी विकी गुप्ता आणि सागर पाल यांच्यानंतर आणखी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. दोन्हीही आरोपींना गुरूवारी रात्री उशिरा मुंबई क्राईम ब्रँच मुंबईत दाखल झाले. सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद फायरिंग करणाऱ्या विकी आणि सागरला या दोन तरूणांनी पिस्तुल उपलब्ध करुन दिल्याचा दावा मुंबई क्राईम ब्रँचने केला आहे. (Bollywood)

गुरुवारी (२५ एप्रिल) पकडलेल्या आरोपींनी मुख्य आरोपी सागर पाल आणि विक्की गुप्ता यांना ४० राऊंड गोळ्या आणि पिस्तुल दिल्याचा दावा केला जात आहे. या दोघांना पंजाबमधून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन पिस्तुल आणि जिवंत काडतुसे पुरवल्याप्रकरणी सोनू चंदर (३७) आणि अनुज थापन (३२) यांना दक्षिण पंजाबमधून अटक करण्यात आली. दोघेही सामान्य व्यक्ती असून त्यांना बिष्णोई गँगकडून दोन पिस्तुल आणि ४० काडतुसे पुरवण्यात आले होते. हे दोघेही मार्च महिन्यामध्ये, विकी आणि सागरला पिस्तुले देण्यासाठी पनवेलला आले होते. (Bollywood News)

व.पो.नि. दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईनंतर मुंबई क्राईम ब्रँच गुरूवारी रात्री उशीरा आरोपींना घेऊन मुंबईत दाखल झाले. दोन्ही आरोपींना शुक्रवारी मुख्य दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. दोन्ही आरोपींकडे गोळीबाराच्या घटनेवेळी एकूण ४० गोळ्या होत्या. त्यांनी फायरिंगसठी ५ गोळ्या वापरल्या होत्या. तर हल्लेखोरांकडून १७ गोळ्या पोलिस तपासात जप्त करण्यात आलेल्या आहेत. पोलिसांना अजूनही १८ गोळ्यांचा तपास लागलेला नाही, अशी माहिती क्राईम ब्रँचने कोर्टामध्ये दिली आहे. (Mumbai News)

सागर आणि विक्की हे दोन्हीही हल्लेखोर बिहारचे रहिवासी आहेत. हल्ल्याबद्दल त्यांना कुणाकडून आर्थिक मदत मिळाली, याचा तपास करणं महत्वाचं आहे. दोघांचंही भाईजानसोबत कुठलंही वैर नाही. तरीही त्या दोघांनी सलमानच्या घराबाहेर फायरिंग का केली? त्यांना कोण आणि कुठून आदेश देत होतं? हे तपासामध्ये लवकरच समोर येईल. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kala Chana Chaat Recipe : कांदा-लसूण न घालता झटपट बनवा ढाबा स्टाइल गरमागरम 'काळा चणा मसाला', वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: विक्रोळीत शॉपिंग सेंटरला जवळच्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

Rules flouted by police: नियम धाब्यावर? एकाच बाईकवरून तीन पोलिसांचा प्रवास; Video Viral होताच लोक संतापले

Ambernath Politics: अंबरनाथच्या राजकारणाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा, भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली, शिंदेंनी डाव टाकला, काय घडलं?

Ind vs NZ playing 11 : न्यूझीलंडविरुद्ध कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? रोहित शर्मा, विराट कोहली खेळणार का? कोण बसेल बाकावर?

SCROLL FOR NEXT