Samantha Ruth Prabhu : समांथाच्या फॅशनचा थाटच न्यारा, हटक्या पद्धतीने कॅरी केला वेडिंग गाऊन

Samantha Ruth Prabhu Video : अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने नुकतंच एका अवॉर्ड फंक्शनसाठी हजेरी लावली होती. सध्या तिच्या लूकचे चाहत्यांकडून कौतुक होत असून तिच्या नव्या फोटोंमधील फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले.
Samantha Ruth Prabhu New Look
Samantha Ruth Prabhu New LookInstagram

Samantha Ruth Prabhu New Look

टॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने अवघ्या काही तासांपूर्वीच लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी समांथा आपल्या हेल्थमुळे चर्चेत होती. आता सध्या तिची प्रकृती स्थिर असून सध्या अभिनेत्री आपल्या फॅशनमुळे कमालीची चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकतंच एका अवॉर्ड फंक्शनसाठी हजेरी लावली होती. सध्या तिच्या लूकचे चाहत्यांकडून कौतुक होत असून तिच्या नव्या फोटोंमधील फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधले. (Tollywood)

Samantha Ruth Prabhu New Look
Heeramandi Web Series : ‘हिरामंडी’च्या शुटिंगला किती दिवस लागले? तयार व्हायला कोण वेळ घ्यायचं? टीमने सांगितली पडद्यामागची गोष्ट

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने ELLE सस्टेनब्लिटी अवॉर्ड २०२४ (ELLE Sustainability Awards 2024) या अवॉर्ड फंक्शनसाठी उपस्थिती लावली होती. यावेळी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनीही उपस्थिती लावलेली होती. अशातच समांथाच्याही फॅशनची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्रीने या इव्हेंटला कॅरी केलेला ड्रेस कसा बनवला आहे, याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचा ड्रेस एका हटक्या स्टाईलमध्ये बनवताना दिसत आहे. क्रेशा बजाजने हा ड्रेस डिझाईन केलेला आहे. या डिझाईनरच्या ह्या ड्रेसची सध्या जोरदार चर्चा होत आहे. (Fashion)

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने या अवॉर्ड फंक्शनसाठी २०१६ मधील जुना गाऊन रिक्रिएट करून वेअर केलेला आहे. हा समांथाचा खरंतर वेडिंग गाऊन होता, जो तिने पूर्णपणे न्यू क्रिएट केलेला दिसत आहे. या न्यू क्रिएट गाऊनमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. क्रेशा बजाजने २०१७ मध्ये समांथासाठी तिच्या लग्नाचा गाऊन डिझाइन केला होता, याचा BTS Video सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. समंथाचा हा व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झाला आहे. समंथाच्या ह्या व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. (Social Media)

Samantha Ruth Prabhu New Look
Dhanashree Bhalekar Mother Death : 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीला मातृशोक; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी तुला वचन देते आई...'

दरम्यान, समंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट कलाविश्वात प्रचंड चर्चेत राहिला. घटस्फोटानंतर समंथाच्या आरोग्यावरही परिणाम झाला होता. ज्यामुळे या सगळ्याचा परिणाम तिच्या करिअरवर झाला. पण आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे. (Entertainment News)

Samantha Ruth Prabhu New Look
Konkona Sen And Amol Parashar Dating Rumours : कोंकणा पुन्हा प्रेमात? ७ वर्षे लहान अभिनेत्याला करतेय डेट; त्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com