Dhanashree Bhalekar Mother Death : 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीला मातृशोक; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी तुला वचन देते आई...'

Dhanashree Bhalekar News : झी मराठी टिव्हीवरील 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत फाल्गुनी पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री भालेकर हिला मातृशोक झाला आहे. अभिनेत्री इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.
Dhanashree Bhalekar Mother Dies
Dhanashree Bhalekar Mother DiesInstagram

Dhanashree Bhalekar Mother Dies

सध्या झी मराठी टिव्हीवर 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेप्रमाणेच मालिकेतील कलाकारही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. अशातच मालिकेतील एका अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मालिकेत फाल्गुनी पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री भालेकर हिच्या आईचे निधन झाले आहे. या अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही दु:खद बातमी दिलेली आहे. (Televesion Actor)

Dhanashree Bhalekar Mother Dies
Konkona Sen And Amol Parashar Dating Rumours : कोंकणा पुन्हा प्रेमात? ७ वर्षे लहान अभिनेत्याला करतेय डेट; त्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

आईच्या आठवणीत धनश्रीने भावुक पोस्ट शेअर करत, तिच्या आयुष्यामध्ये आई किती महत्त्वाची आहे, याबद्दल सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून तिची आई आजारी होती. अखेरच्या काही दिवसांत प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली आणि धनश्रीच्या आईचे १८ एप्रिलला निधन झाले. (Social Media)

धनश्री भालेकरची आईसाठी पोस्ट

"आई... I miss you अगं. आज 8 दिवस झाले पण मला अजूनही हे मान्यच करता येत नाहीये की तू आमच्यात नाही आहेस. I need you the most, खूप एकटी पडले आहे ग मी आई. माझ्याशी बोलायला, share करायला कोणीच नाहीय, मला हवी आहेस तू, मी नाही राहू शकत आहे तुझ्याशिवाय. तुझं नसणं म्हणजे माझ्यामधला एक भाग वगळल्यासारखं आहे.

माझ्या आयुष्यातलं motivation हरवलं आहे, Incomplete feel करते आहे खुप. किती particular असतं तुझं सगळं, तुझं perfection आणि super hygiene खुप miss करते मी. मला तुझ्याबरोबर खूप बोलायचं आहे, मी सगळं कोणाला सांगू, कोणाबरोबर गप्पा मारत बसू ? असं वाटतंय तू आहेस cricket match बघताना खुश होशील, सगळ्या serial च्या stories सांगशील मला घरी आल्यावर. Kitchen मध्ये आहेस, येशील माझा favourite पदार्थ बनवून आणि मी बाहेरुन घरी आल्यावर देशील मला खायला, घराबाहेर पडताना bye करायला दाराबाहेर आणि खिडकीत येशील. 

मला खुप आठवण येते आहे ग तुझी, blank झाले आहे मी, तुझ्याशिवाय काय करावं सुचत नाही आहे... मला माहिती आहे तू ऐकत आहेस, बघत आहेस, तुझा लक्ष आहे माझ्यावर. मी promise करते आई तुला दिलेले commitments आणि तू पाहिलेली स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. तू आता जिथे आहेस तिथून मला आशीर्वाद दे आणि तू तूझी काळजी घे आणि प्रत्येक जन्मात माझी आई म्हणून तूच ये. खुप खुप प्रेम. Love you आई", असे धनश्री भालेकरने म्हटले आहे. (Marathi Actress)

दरम्यान धनश्री भालेकर ही सध्या 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेमध्ये अभिनेत्री फाल्गुनी नावाचे पात्र साकारत आहे. धनश्रीने मराठीसह हिंदी मालिकेतही काम केले आहे. (Entertainment News)

Dhanashree Bhalekar Mother Dies
Baipan Bhari Deva Television Premier: 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर, कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com