Animal Day 17 Box Office Collection  Instagram
मनोरंजन बातम्या

Animal Day 17 Collection: रणबीर- रश्मिकाच्या ‘ॲनिमल’ने बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस; १००० कोटींच्या क्लबकडे वाटचाल

Animal Box Office Collection: फक्त देशातच नाही तर जगभरामध्येही रणबीर- रश्मिकाच्या ‘ॲनिमल’ची यशस्वी घोडदौड सुरु आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून एक-एक रेकॉर्ड ब्रेक करत आहे.

Chetan Bodke

Animal Day 17 Box Office Collection

सध्या बॉक्स ऑफिसवर रणबीर- रश्मिकाच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. फक्त देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. रणबीर- रश्मिकाचा ‘ॲनिमल’ आणि विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ १ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. पण असलं तरी, ‘ॲनिमल’ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा सुरु आहे. पण इतका चांगला विषय असूनही ‘सॅम बहादुर’ला प्रेक्षकांकडून इतका खास प्रतिसाद मिळत नाही. चित्रपट प्रदर्शित होऊन १७ दिवस झाले आहेत. जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाईबद्दल...

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सॅकल्निकच्या अहवालानुसार, रणबीर- रश्मिकाच्या ‘ॲनिमल’ने देशासह परदेशामध्येही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाने १७ व्या दिवशी देशामध्ये १४.६८ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने एकूण १७ दिवसांमध्ये ५१२ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरामध्ये चित्रपटाने ८१७. ३६ कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटाच्या कमाईचा चढता आलेख पाहता लवकरच ‘ॲनिमल’ चित्रपट १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. सध्या फक्त चित्रपटाचीच नाही तर, कलाकारांची आणि गाण्यांचीही सध्या चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा होताना दिसत आहे.

तर विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, चित्रपटाने १७ दिवसांमध्ये, बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करु शकलेला नाही. उत्तम कथा आणि दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर इतकी खास चर्चाही पाहायला मिळत नाही. या चित्रपटाच्या कमाईच्या आलेखामध्ये सतत चढ उतार पाहायला मिळत आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण ७६. ७२ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास ५५ कोटींचा खर्च लागला आहे. (Bollywood Film)

‘ॲनिमल’मध्ये प्रमुख भूमिकेत रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आहेत. तर ‘सॅम बहादुर’ मध्ये विकी कौशल सह फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी सारखे प्रतिभावान कलाकार चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

Pani puri masala recipe: घरीच बनवा पाणीपुरीच्या तिखट पाण्याचा सुका मसाला; एक चमचा पाण्यात घाला की काम झालंच

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

SCROLL FOR NEXT