बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या वरुण धवनबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. सध्या वरुण त्याच्या 'VD 18' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्या सेटवरून रोज नवीन अपडेट्स समोर येत राहतात. अशातच वरुण धवनबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. या अभिनेत्याचा चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला असून त्यात तो जखमी झाला आहे.
या अपघातामुळे वरून जखमी झाला असून त्याने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना याची माहिती दिली. वरुणने आता त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करून त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. अभिनेत्याने इन्स्टा स्टोरीवर स्वतःचा एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये त्याचा फक्त पाय दिसत आहे, ज्यामध्ये पायाला बरीच सूज आल्याचं दिसतंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्याने इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर केल्यानंतर अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. असं असलं तरी घाबरण्याची गरज नाही. वरुणला गंभीर दुखापत झालेली नाही. तो बरा असून त्याला कोणताही मोठा अपघात झाला नाही. (Latest Marathi News)
त्याला किरकोळ दुखापत झाली आहे, त्यामुळे चाहत्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही. याआधीही वरुणने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीची माहिती चाहत्यांना दिली होती.
याआधीही त्याला झाली होती दुखापत
दरम्यान, वरुण धवन आपल्या या चित्रपटात खूप मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. अभिनेता सेटवर वारंवार जखमी होत आहे, तरीही कामाबद्दलचे त्याचे समर्पण कमी होत नाही. या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर वरुणसोबत 'VD 18' मध्ये कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.