Chetan Bodke
सध्या सोशल मीडियासह सर्वत्र रणबीर आणि रश्मिकाच्या ‘ॲनिमल’ चित्रपटातील ‘जमाल कुडू’ गाण्याची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे.
अगदी सामान्य नागरिकांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच या गाण्याची भुरळ पडली आहे. बॉबी देओलच्या एन्ट्रीवर हे गाणं असून गाण्यातल्या एका तरुणीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
गाण्यामध्ये काही तरुणी गाणं गाताना दिसत आहे. त्यातील एक तरुणी सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून ती इराणीयन मॉडल आणि डान्सर आहे. तिचं नाव तन्नाझ दावूदी असं आहे.
‘ॲनिमल’ चित्रपटातल्या कलाकारांच्या अभिनयाची जोरदार चर्चा होते. तृप्ती डिमरीनंतर आता तन्नाझ दावूदीच्या अभिनयाची चर्चा होत आहे. चित्रपटामुळे दोघींच्याही फॅन लिस्टमध्ये वाढ झाली आहे.
गाण्याला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे तन्नाझच्या इन्स्टाग्रामच्या फॅनलिस्टमध्ये बरीच वाढ झाली आहे. तृप्ती डिमरीप्रमाणे तन्नाझलाही नेटकरी नॅशनल क्रश म्हणूनच बोलतात.
२७ जुन १९९७ रोजी तन्नाझचा इराणमधील तेहरान मध्ये जन्म झालाय. ती पत्रकार मेहदी अलियारी यांची मुलगी आहे.
२०१४ ते २०१७ च्या काळामध्ये तन्नाझने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने काही कंपन्यांमध्ये इंटर्नशिपही केली.
तन्नाझने यापूर्वी बॉलिवूडमध्ये डान्सर म्हणून काम केले आहे. पण तिला सर्वाधिक पसंदी ‘ॲनिमल’ चित्रपटातूनच मिळाली.
सध्या तन्नाझचे इन्स्टाग्रामवर २.६ लाखांपर्यंत फॉलोवर्स आहेत.