Pathan 27th Day Collection: अखेर 'पठान'चा १००० कोटींच्या क्लबमध्ये समावेश, महिन्याभरातच कमावले घवघवीत यश

'पठान' चित्रपटाने 1000 कोटींचा आकडा केला पार.
Pathaan Producer new Statergy
Pathaan Producer new Statergy Saam Tv
Published On

Pathan Movie Crossed 1000 Crore On Box Office: 'पठान' चित्रपट प्रदर्शित होऊन २७ दिवस झाले आहेत. आज या चित्रपटाचा २८वा दिवस आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली होती. तर अॅडव्हान्स बुकिंगमध्ये अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. तर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने अनेक नवीन रेकॉर्ड बनविले आहेत. हा चित्रपट १००० कोटींच्या यादीत समाविष्ट होण्यापासून काही करोडोंनी दूर होता.

२५ जानेवारीला प्रदर्शित झालेला 'पठान' चित्रपटाचा गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिस दबदबा आहे. या चित्रपटामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांना दणका बसला आहे. तर 'पठान'समोर कार्तिक आर्यनची देखील जादू चालली नाही. परंतु या चित्रपटाला १००० कोटींपर्यंत यायला वेळ लागला.

नुकत्याच आलेल्या अहवालानुसार 'पठान'ने बॉक्स ऑफिसवर 27 व्या दिवशीही कार्तिक आर्यनच्या शेहजादापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. 'पठान' निर्मात्यांनी चित्रपटाच्या तिकिटांची किंमत देखील 110 रुपये केली होती. चित्रपटगृहांमध्ये 'पठान' वीक सुरू केला. यामुळे 'पठान' बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा आकडा सहज पार करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती.

निर्मात्यांची ही अपेक्षा खरी ठरली आहे. 'पठान' चित्रपटाने 20 फेब्रुवारी रोजी 1.50 कोटी ते 3 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. 19 फेब्रुवारीच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. YRF ने नुकतीच त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 'पठान' चित्रपटाने 1000 कोटींचा आकडा पार केल्याची माहिती दिली आहे.

YRF च्या म्हणण्यानुसार, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ६२३ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ३७७ कोटी रुपयांची कमाई करण्यात चित्रपट यशस्वी झाला आहे.

आरआरआर चित्रपटाने ११५६ कोटींची कमाई केली होती. तर प्रशांत नील यांच्या केजीएफ २ने जगभरात १२७८. कोटी कमवले होते. तर गेल्या वर्षी ब्रह्मास्त्र सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com