Pravin Tarde Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pravin Tarde Post: 'पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली...' मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रवीण तरडेंची खास पोस्ट

Pravin Tarde Post For MP Murlidhar Mohol: अभिनेता प्रवीण तरडे आणि खासदार मुरलीधर मोहोळ हे खूप खास मित्र आहे. मुरलीधर मोहोळ यांनी काल मंत्रीपदाची शप्पथ घेतली. मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रवीण तरडेंनी खास पोस्ट केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशात काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले. संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे होतं. महाराष्ट्रात पुण्यातून मुरलीधर मोहोळ खासदार म्हणून विजयी झाले. काल झालेल्या मंत्रीमंडळात मुरलीधर मोहोळ यांची समावेश आहे. मुरलीधर मोहोळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर मित्र प्रवीण तरडे यांनी खास पोस्ट केली आहे.

प्रवीण तरडे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती. पुण्यात अनेक ठिकाणी फिरुन त्यांनी मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार केला होता. मित्र मंत्रीमंडळा सहभागी झाल्याने प्रवीण तरडे यांना खूप आनंद झाला आहे. प्रवीण तरडेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले आहे.

प्रवीण तरडे यांनी मुरलीधर मोहोळ यांचा शपथ घेतानाचा फोटो पोस्ट करत खास कॅप्शन दिले आहे.'मित्रा ,आज शब्दं अपुरे पडतील पण लेखन थांबायचं नाही. कित्येकजण योगायोगानं राजकारणात येतात पण तू काहीतरी ठरवून यामधे आलास. राजकारणात येवून लोक समाजकारण लोणच्या सारखं वापरतात पण तु ते ताट भरून घेतलंस,पोटभरून रिचवलंस.. कदाचित म्हणुनच कोरोनाच्या महामारीत तु पुण्याला वाचवलंस' .

तुझ्या त्या पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली अन् पुणेकरांनी पण त्याची सव्याज परतफेड केली.. तुला लोखोच्या मताधिक्यानं दिल्ली दाखवली.. दिल्लीनं तर दिलादारपणाचा कळस गाठला आणि थेट मंत्रीपदाची माळ तुझ्या गळ्यात घातली,असं त्यांनी लिहलं आहे.

'पण मित्रा एवढं सगळं होउनही असं वाटतय ही तर फक्तं सुरवात आहे अजुनही “ परम वैभवम नेतुमेतत स्वराष्ट्रम “ या दैवी संदेशा पासून आपण थोडं दूरच आहोत.. येत्या पंचवीस वर्षात जितकं जमेल तितकं या दैवी संदेशाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू .पुण्येश्वराची पुण्याई तुझ्या पाठीशी आहेच बाकी मुळशीची शान , पुण्याचा अभिमान , भारत देशाचा स्वाभिमान ठरो.तुझं खुप अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा', असं कॅप्शन त्यांनी पोस्टवर दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

रुपाली चाकणकराचं अध्यक्षपद धोक्यात?डॉक्टरचा सीडीआर जाहीर करणं भोवणार?

Jio: धमाकेदार ऑफर, युजर्सला थेट ३५ हजाराचा फायदा, जिओची अनोखी स्किम

SCROLL FOR NEXT