Modi 3.0 Cabinet: पहिल्याच संधीत मंत्रिपद; नगरसेवक ते खासदार असा आहे मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास

Member Of Parliament Murlidhar Mohol's Political Career: मुरलीधर मोहोळ हे पैलवान देखील आहेत. दहावीनंतरचे शिक्षण आणि कुस्तीचे डाव शिकण्यासाठी मोहोळ यांनी कोल्हापूर गाठलं. कुस्तीच्या आखाड्यासह त्यांनी राजकीय आखाड्यात मोठी कामगिरी केलीय. मोहोळ यांनी नगरसेवक ते खासदारकीचा टप्पा गाठलाय. ते देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय आहेत.
Modi 3.0 Cabinet: पहिल्याच संधीत मंत्रिपद; नगरसेवक ते खासदार असा आहे मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास
Member Of Parliament Murlidhar Mohol Saam Tv

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागलीय. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आज शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत ४१ खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे.

मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला होता. नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे. दरम्यान मोहोळ हे देवेंद्र फडणवीस यांचे नीकटवर्तीय आहेत.

मंत्रिपद मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ प्रतिक्रिया देताना म्हणाले की, पुणेकरांची जशी सेवा केली तशी देशाची सेवा करायची आहे. स्वप्नातही वाटलं नव्हत मंत्रिपद मिळेल असं, पण अचानक फोन आला आणि सांगितलं तुम्हाला शपथ घ्यायची आहे. मोदींनी आज मार्गदर्शन केलं. सगळे नव्याने मंत्री बनणारे उपस्थित होते. आगामी काळात काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चांगलं काम करून पुण्याचं नाव करू असं मोहोळ म्हणालेत.

दरम्यान मोहोळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पुण्यातील भाजप कार्यकर्ते आनंदी झालेत. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यात जल्लोष केला जाणार आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल पुणे शहर भाजपच्या वतीने विजयोत्सव केला जाणार. संध्याकाळी ६ वाजता विजयोत्सव साजरा केला जाणार आहे.

कोण आहेत मुरलीधर मोहोळ

नाव : मुरलीधर किसान मोहोळ जन्म मुळशी

९ नोव्हेंबर १९७४

शिक्षण: १९९९ मध्ये BA कोल्हापूर युनिव्हर्सिटी

कुस्तीची आवड - मोहोळ यांनी पुण्यात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. मुरलीधर मोहोळ यांनी पुढे कॉलेज आणि कुस्तीसाठी कोल्हापूर गाठले. कोल्हापुरात तालीम केलेले मोहोळ 1993 मध्ये पुण्याच्या राजकीय आराखड्यात उतरले. त्यामुळे कसलेला पैलवान ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास अनेकांना आश्चर्यचकित करणारा आहे.

मुरलीधर मोहोळांची राजकीय कारकीर्द?

पोट निवडणुकामध्ये पहिले नगरसेवक बनून पुण्याच्या राजकारणात सक्रिय

* पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी - २००२, २००७, २०१२ आणि २०१७

* महापौर, पुणे महानगरपालिका २०१९-२०२२

* उपाध्यक्ष, अखिल भारतीय महापौर परिषद

* पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष - २०१७-१८

* संचालक, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल)- २०१७-१८

* संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)- २०१७-१८

* सभासद, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) २०१७-२०१८

खडकवासला (पुणे) मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार - २००९

Modi 3.0 Cabinet: पहिल्याच संधीत मंत्रिपद; नगरसेवक ते खासदार असा आहे मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास
NDA Government: नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळातून पत्ता कट; भागवत कराड यांनाही डच्चू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com