Devendra Fadnavis and amit shah : दिल्लीत देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची भेट; बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?

Devendra fadnavis meet amit shah in Delhi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत महायुतीचा पराभव आणि राजीनाम्याविषयी चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिल्लीत देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची भेट; बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?
Devendra Fadnavis and amit shah :Saam tv

नवी दिल्ली : राज्यात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, फडणवीसांच्या निर्णयाला भाजपमधील नेत्यांनी विरोध केला. या सर्व घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले. दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. फडणवीसांनी गुरुवारी रात्री उशिरा अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये झालेल्या बैठकीत राज्यातील पराभवाविषयी चर्चा झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्यावर ठाम असल्याचं अमित शहा यांच्याशी बोलताना स्पष्ट केलं.

दिल्लीत देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची भेट; बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?
Politics News : नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा करणार दावा; दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

राजीनामा देऊन संघटनात्मक पातळीवर काम करण्यासाठी गरज असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी बोलताना नमूद केलं. राज्यातील पराभवांच्या कारणांवर देखील बैठकीत चर्चा झाली. मात्र, या बैठकीत राजीनाम्यावर कुठलाही निर्णय झाला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. राजीनामा हा नाराजीतून नाही तर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

दिल्लीत देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची भेट; बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?
Maharashtra Politics: ब्रेकिंग! कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा दिलासा; मनसेची निवडणुकीतून माघार

अजित पवार घेणार अमित शहा यांची भेट?

राष्ट्रीय लोकशाही आघाडीयच्या बैठकीनंतर आज अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होण्याची शक्यता आहे. राज्यात महायुतीचा दारुण पराभव झाला, या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही नवी रणनीती ठरविण्यात येण्याची शक्यता आहे. तर अजित पवार गटाला नव्या सरकारमध्ये एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. या मंत्रिपदासाठी प्रफुल पटेल यांचं नाव आघाडीवर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com