Politics News : नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा करणार दावा; दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

NDA Meeting Today in Delhi : भाजपकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आज शुक्रवारी राजधानी दिल्लीत एनडीएच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे
नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा करणार दावा; दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग
PM Narendra Modi Letter To Indians On kanyakumari SankalpSaamtv

लोकसभा निवडणुकीत ५४३ पैकी २९३ जागा जिंकत भाजप प्रणित एनडीएने बहुमत मिळवलं. त्यानंतर आता भाजपकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आज शुक्रवारी राजधानी दिल्लीत एनडीएच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत महाआघाडीकडून सरकार स्थापनेवर चर्चा होणार आहे.

नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा करणार दावा; दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग
Ajit Pawar on Election: मीच कमी पडलो; लोकसभेतील पराभवावर अजित पवारांची जाहीर कबुली

या बैठकीला सर्व खासदारांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी ११ वाजता सेंट्रल हॉलमध्ये या बैठकीला सुरुवात होईल. बैठकीत महत्वाची खाती कुणाकडे दिली जाणार याबाबत चर्चा केली जाईल. त्यानंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

बैठकीत नरेंद्र मोदी यांना संसदीय दलाचा नेता म्हणून निवडलं जाणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांची भेट घेऊन नरेंद्र मोदी सत्तास्थापनेचा दावा करतील. त्यानंतर येत्या ९ जून रोजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय.

याआधी बुधवारी एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. बैठकीनंतर मोदींनी सांगितले की, देशात पुन्हा भाजप प्रणित एनडीएचं सरकार स्थापन होईल. विकसित भारतासाठी आम्ही नव्या जोमाने काम करू. गुरुवारच्या बैठकीतच मंत्रिमंडळ विभाजनाबाबत एक फॉर्म्युला तयार केला जाईल, ज्यावर सहमती होईल, असे मित्रपक्षांना सांगण्यात आले.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएमधील पक्षांकडून अद्याप मंत्रिपदाविषयी कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. मात्र, पाच खासदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्यूला वापरला जाऊ शकतो. ज्यांची सर्वाधिक खासदार असतील, त्यांनाच जास्त मंत्रिपदे मिळतील, असंही सांगण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाला प्रत्येकी तीन मंत्रीपदे दिली जाऊ शकतात. दुसरीकडे महाराष्ट्रात ७ जागा जिंकणाऱ्या शिवसेना शिंदे गटाने केंद्रात दोन मंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना केवळ एकच मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

गुरुवारी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासंदर्भात दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी दीर्घ बैठकही झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा करणार दावा; दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग
Rahul Gandhi : विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधींची निवड होणार?; लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com