Maharashtra Politics: ब्रेकिंग! कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा दिलासा; मनसेची निवडणुकीतून माघार

MNS Abhijit Panse Withdrawal From Kokan Graduate Constituency: उमेदवार जाहीर केल्यानंतर मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
 मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतली
Konkan Graduate ConstituencySaam Tv

कोकण पदवीधर मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार जाहीर केल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतली आहे. या जागेवर मनसेने अभिजीत पानसे यांना उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. परंतु आता या अभिजीत पानसे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याची माहिती मिळत आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातून आता भाजप उमेदवार वसंत डावखरे निवडणूक लढवणार (Maharashtra Politics) आहेत. परंतु राज ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार का घेतली, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघात उमेदवार घोषित करून राज ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. परंतु आता मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतल्याने चर्चांना उधाण आलं (Kokan Graduate Constituency) आहे.

आता विधानसभेचं बिगुल वाजण्याआधी जागांवरून मोठी रस्सीखेच सुरू झाल्याचं समोर आलं होतं. लोकसभेनंतर आता राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहेत. राज ठाकरेंनी (MNS) लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता, तर कोकण पदवीधर मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु मनसेने आता अचानक माघार घेतली आहे.

 मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतली
MNS Melava: राज ठाकरे आमचे दैवत, त्यांची भूमिका आम्हाला मान्य; मनसैनिकांची प्रतिक्रिया

लोकसभेनंतर राज्यामध्ये राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. आता कोकण पदवीधर मतदारसंघात आमदार निरंजन डावखरे हे भाजपचे उमेदवार आहेत. अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांनी माघार घेतल्यामुळे डावखरेंसाठी ही लढत काहीशी सोपी झाली, अशा चर्चा रंगत आहेत. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आता आणखी कोणत्या राजकीय घडामोडी कोकण पदवीधर मतदारसंघात पाहायला मिळतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

 मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतली
MNS Gudi Padwa Melava: डॉक्टर काय मतदारांच्या नाड्या तपासणार का? निवडणूक आयोगाला राज ठाकरेंचा टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com