Pune Rain Update: पुणे जलमय! पावसामुळे पुणेकर बेहाल, १५ ठिकाणी झाडं कोसळली; रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी

Heavy Rainfall In Pune: पुण्याला आज झालेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या, झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. यामुळे पुण्यात ठिकाठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Pune Rain Update: पुणे जलमय! पावसामुळे पुणेकर बेहाल, १५ ठिकाणी झाडं कोसळली; रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी

सागर आव्हाड, पुणे

पुणे शहरात गेल्या दीड ते दोन तासांपासून जोरदार पाऊस (Pune Rainfall) सुरू आहे. या पावसामुळे पुण्यातील अनेक भागात तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळे पुणेकर बेहाल झाले आहेत. पावसामुळे पुणे जलमय झाले आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले असून शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पुण्यात १५ पेक्षा जास्त ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

हवामान विभागाने कालपासून राज्यातील अनेक विभागांना यलो अलर्ट दिला होता. पुणे शहरात आतापर्यंत एका तासात १०० मिली मिटर इतका पाऊस झाला असल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. पुणे शहरातील अनेक भागात झाडे उन्मळुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यात छोटे असो वा मोठे सर्वच रस्त्यांवर पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यात मान्सून दाखल झाला असून पहिल्याच पावसात पुण्याची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील मुख्य पेठांमध्ये रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. तर उपनगरांमध्ये देखील अनेक घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक संसार उपयोगी वस्तू खराब झाल्या आहेत. रस्त्यांवर गुडघाभर पाणी असल्यामुळे या पाण्यामध्ये अनेक वाहनं बंद पडली आहेत. त्यामुळे पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Pune Rain Update: पुणे जलमय! पावसामुळे पुणेकर बेहाल, १५ ठिकाणी झाडं कोसळली; रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी
Pune Rain Video: पुण्याला पावसाने झोडपलं, रस्त्यांना नदीचे स्वरुप; ओढ्याला पूर आल्याने घरांमध्ये शिरले पाणी

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात सुरु असलेला मुसळधार पावसामुळे अग्निशमन दलाकडे सद्यस्थितीत जवळपास १५ पेक्षा अधिक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्याची नोंद झाली आहे. झाडं कोसळल्याच्या घटनांची संख्या वाढतच चालली आहे. पुण्यातील ठिकठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पुणे शहरातल्या पावसामुळे स्वारगेट बस स्थानकात पाणीच पाणी झाले आहे. संपूर्ण बस स्थानक पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहे.

पुण्यातल्या औंध येथील हिंद सोसायटी, गणेशखिंड रोड, लोहगाव बसस्थानक, भक्ती-शक्ती चौक, कोथरुडच्या गणेशनगरमधील नेहरू वसाहतीमध्ये पाणी साचले आहे. तर पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये देखील पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे याठिकाणावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह प्रवाशांचे हाल होत आहे.

Pune Rain Update: पुणे जलमय! पावसामुळे पुणेकर बेहाल, १५ ठिकाणी झाडं कोसळली; रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी
Pune Porsche Car Accident: ससूनच्या शिपायाला ३ लाख रुपये कुणी आणि कुठे दिले?, CCTV तपासातून समोर आली मोठी अपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com