'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
अभिनेत्री लवकरच लग्न बंधानात अडकणार आहे.
होणाऱ्या नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत.
मराठी मनोरंजन सृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अभिनेत्री अपूर्वा गोरेने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिने होणार्या नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. अपूर्वा गोरे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या आयुष्याचे आणि कामाचे अपडेट ती कायम देत राहते.
अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहे. मात्र अभिनेत्रीने आपल्या जोडीदाराचा चेहरा लपवला आहे. त्यामुळे अपूर्वाचा होणारा नवरा कोण? , हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. तिचा होणारा नवरा मनोरंजन सृष्टीतील आहे की आणखी कोण? हे लवकरच आपल्याला समजले.
फोटोंमध्ये दोघेही पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. अपूर्वाने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दोघे एकमेकांमध्ये गुंतलेले पाहायला मिळत आहे. या फोटोंना तिने खूप खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "चाफा आणि तो...मला खुप आवडतात..." तसेच तिने कॅप्शनमध्ये अंगठीचा इमोजी देखील टाकला आहे. त्यामुळे असे दिसून येते की, अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा देखील उरकला आहे.
अपूर्वा गोरेच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. अपूर्वा गोरेने 'आई कुठे काय करते' मालिकेत ईशाची भूमिका साकारली होती. ती कायम सोशल मीडियावर आपल्या लूकचे फोटो शेअर करताना दिसते. तसेच आपली मते परखडपणे मांडते. चाहते आता अपूर्वा गोरेच्या नवीन प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.