Border 2 vs Mardaani 3 Collection
Border 2 vs Mardaani 3 Collection

Border 2 vs Mardaani 3 Collection : 'बॉर्डर 2'च्या कमाईत दुसऱ्या सोमवारी घसरण; 'मर्दानी 3' देतोय तगडी टक्कर, वाचा कलेक्शन

Border 2 vs Mardaani 3 Box Office Collection : दुसऱ्या सोमवारी 'बॉर्डर 2'च्या कमाईत घसरण झाली आहे. चित्रपटाने किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.
Published on
Summary

'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

'मर्दानी 3' सिनेमा 30 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

'बॉर्डर 2' च्या कमाईत घसरण झाली आहे.

'बॉर्डर 2' चित्रपटाने दोन आठवड्यात बक्कळ पैसा कमावला आहे. चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. सनी देओलचा 'बॉर्डर 2' चित्रपट 23 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. तर 'बॉर्डर 2'च्या पाठोपाठ राणी मुखर्जीचा 'मर्दानी 3' चित्रपटही थिएटरमध्ये गाजताना दिसत आहे. मात्र 'मर्दानी 3' ला हवे तेवढे यश मिळत नाही. 'मर्दानी 3' सिनेमा 30 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चौथ्या दिवशी कमाईत घट झाली आहे.

'मर्दानी 3' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'मर्दानी 3' चित्रपटाने चार दिवसांत 19 कोटी रुपयांच्यावर कमाई केली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'मर्दानी 3' चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी 2.15 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाच्या कमाईत घट झालेली पाहायला मिळत आहे. चार दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई जवळपास 19.65 कोटी रुपये झाली आहे.

  • पहिला दिवस - 4 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 6.25 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 7.25 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 2.15 कोटी रुपये

  • एकूण - 19.65 कोटी रुपये

'बॉर्डर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या रिपोर्टनुसार,'बॉर्डर 2' चित्रपटाने 11 दिवशी तब्बल 5.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 281.00 कोटी झाले आहे.

  • पहिला दिवस - 30 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 36.5 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 54.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 59 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 20 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 13 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 11.25 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 10.75 कोटी रुपये

  • नववा दिवस - 17.75 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 22.5 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 5.75 कोटी रुपये

  • एकूण - 281.00 कोटी रुपये

'बॉर्डर 2' vs 'मर्दानी 3'

'मर्दानी 3' चित्रपटात राणी मुखर्जी, जानकी बोडीवाला आणि मल्लिका प्रसाद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'मर्दानी 3' चित्रपटाचे दिग्दर्शन अभिराज मीनावाला यांनी केले आहे. चित्रपटात राणी मुखर्जीने शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारली आहे. 'बॉर्डर 2' चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग सिंह हे आहेत. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, परमवीर सिंह चीमा, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मेधा राणा आणि मोना सिंग झळकले आहेत. 'बॉर्डर 2' हा 1997 ला रिलीज झालेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल आहे.

Border 2 vs Mardaani 3 Collection
Bigg Boss Marathi 6 : मैत्रीत फूट; ९ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, कोण जाणार घराबाहेर?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com