Shreya Maskar
'मर्दानी 3'मधून पुन्हा एकदा राणी मुखर्जी पोलीसांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'मर्दानी 3' सिनेमा 30 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
'मर्दानी 3' हा 'मर्दानी' फ्रँचायझीचा सीक्वल आहे. आतापर्यंत 'मर्दानी' सिनेमाचे दोन भाग झाले आहेत. 'मर्दानी' चित्रपट 22 ऑगस्ट 2014 ला रिलीज झाला. तर 'मर्दानी 2' सिनेमा 13 डिसेंबर 2019 ला प्रदर्शित झाला आहे.
'मर्दानी 3' मध्ये राणी मुखर्जीसोबत तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यात मल्लिका प्रसाद, मिखाईल यावलकर आणि जानकी बोडीवाला यांचा समावेश आहे. कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
'मर्दानी 3' साठी राणी मुखर्जीला तब्बल 7 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. 'मर्दानी 3'मध्ये राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसत आहे. राणी मुखर्जी चित्रपटात पोलिस शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसत आहे.
चित्रपटातील मुख्य खलनायिका मल्लिका प्रसादला 50 लाख रुपये मिळाले आहेत. मात्र अद्याप सहाय्यक भूमिकेतील उर्वरित कलाकारांच्या मानधनाबद्दलची माहिती उघड करण्यात आलेली नाही.
गुजराती चित्रपटांमधून प्रसिद्धी मिळवलेली जानकी बोडीवाला 'मर्दानी 3' मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी जानकीला तिच्या भूमिकेसाठी 1 कोटी रुपये फी दिले आहे.
मिखाईल यावलकर हा 'मर्दानी'च्या मागील भागांमध्ये दिसला होता. यावेळीही मिखाईल मुख्य सहाय्यक भूमिकेत आहे. 'मर्दानी 3' मधील भूमिकेसाठी त्याला 70 लाख रुपये मिळाले.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'मर्दानी 3' चित्रपटाने तीन दिवसांत 17 कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटाची कथा आणि राणीचा अभिनय चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.