'बिग बॉस मराठी 6' च्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला आहे.
घरातून 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
सध्या घरात जोड्यांमध्ये टास्क पाहायला मिळत आहेत.
बिग बॉसमध्ये आता चौथा आठवडा सुरू आहे. घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. सध्या घरात जोड्यांमध्ये टास्क पाहायला मिळत आहेत. बिग बॉसने घरातील सदस्यांना जोडींमध्ये अडकवले आहेत. त्यामुळे घरात एक वेगळे समीकरण दिसत आहे. अनुश्रीची जोडी राकेश बापटसोबत तर रुचिताची जोडी तन्वीसोबत लावली आहे. ज्यामुळे घरात खूपच ड्रामा पाहायला मिळत आहे.
'नॉमिनेशनची कुऱ्हाड' या टास्कदरम्यान घरातील सदस्यांनी एकमेकांना नॉमिनेट केले. काहींची मैत्री तुटली, तर काहींना अश्रू अनावर झाले. नॉमिनेशन टास्कमध्ये फुल ड्रामा पाहायला मिळाला. टास्कमध्ये स्पर्धकांना आपल्याला ज्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे. त्याच्या फोटोवर कुऱ्हाडीने वार करायचा असतो. यात सचिन-दिव्याला नॉमिनेट करतो. आयुष-ओमकारला नॉमिनेट करतो आणि ओमकार-आयुषला नॉमिनेट करतो. दोघेही खूप भावुक होतात.
ओमकार राऊत
आयुष संजीव
सचिन कुमावत
प्रभू शेळके
दिपाली सय्यद
अनुश्री माने
दिव्या शिंदे
रोशन भजनकर
राकेश बापट
आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून दोन सदस्य बाहेर गेले आहेत. यात राधा पाटील आणि सोनाली राऊत यांचा समावेश आहे. आता चौथ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.