प्रसाद ओकच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे.
प्रसादच्या लेकाचा थाटामाटात साखरपुडा पार पडला आहे.
अमृता खानविलकरने साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर केले.
सध्या मनोरंजन सृष्टीतून एका मागोमाग एक कलाकारांची लग्न होत आहे. अलिकडेच सोहम बांदेकरने अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता आणखी एक कलाकाराच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे. मराठी अभिनेता प्रसाद ओकचा लेक लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. नुकताच त्याचा साखरपुडा थाटामाटात पार पडल आहे. 'राजश्री मराठी'ने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे प्रेक्षकांचे आवडते जोडपे आहे. आजवर प्रसाद ओकने अनेक मोठ्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तो उत्तम दिग्दर्शक देखील आहे. त्याचा 'चंद्रमुखी' चित्रपट खूप गाजला. या चित्रपटात अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. प्रसाद ओकचा मोठा मुलगा सार्थक ओकचा साखरपुडा पार पडला आहे. त्याच्या साखरपुड्याचे फोटो अमृता खानविलकरने शेअर केले आहेत.
अमृताने शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रसाद ओकचे कुटुंब दिसत आहे. प्रसादच्या होणाऱ्या सूनेचे नाव रितू असे आहे. रितू आणि सार्थक दोघेही साखरपुड्यात सुंदर दिसत होते. यांच्या साखरपुड्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. ज्यात अमृता खानविलकर, स्वप्निल जोशी तसेच महाराष्ट्राची हास्यजत्राचे कलाकार आले होते. सध्या रितू आणि सार्थक यांच्यावर कुटुंब, मित्रमंडळी आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव सार्थक तर छोट्याचं मयांक आहे. आता ओक कुटुंबात नवीन सदस्याची एन्ट्री झाली आहे. सार्थकने जर्मनीत शिक्षण पूर्ण केले. प्रसाद ओकची दोन्ही मुलं खूप creative mind ची आहेत. आता चाहते रितू आणि सार्थकच्या लग्नाची वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.