Palash Muchhal : स्मृतीसोबत लग्न मोडल्यानंतर पलाशचं Move On, 'या' मराठमोळ्या अभिनेत्यासोबत झळकणार

Palash Muchhal New Project : स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल आता पुन्हा कामावर परतला आहे. त्याला एका मोठ्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी मिळाली आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Palash Muchhal New Project
Palash Muchhal saam tv
Published On
Summary

अलिकडेच स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचे लग्न मोडले.

पलाश मुच्छल आता मराठमोळ्या अभिनेत्यासोबत काम करणार आहे.

पलाश एका चित्रपटात दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.

क्रिकेटपटू स्मृती मानधनासोबतचे लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छलला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र आता पलाश आपल्या आयुष्यात पुढे गेला आहे. सध्या तो एक नवीन प्रोजेक्टवर काम करताना दिसणार आहे. लग्न मोडल्यानंतर त्याला मोठी कामाची संधी मिळाली आहे. पलाश मुच्छल चित्रपटसृष्टीत एक नवीन जबाबदारी स्वीकारायला सज्ज झाला आहे.

पलाश मुच्छल आता चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. पलाश मुच्छल एका मराठमोळ्या अभिनेत्याचा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून श्रेयस तळपदे आहे. श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट पलाश दिग्दर्शित करेल. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र चित्रपटात श्रेयस तळपदे common man ची भूमिका साकारणार असल्याचे बोले जात आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे. त्याने लिहिलं की, "पलाश मुच्छलच्या पुढील चित्रपटात श्रेयस तळपदे मुख्य भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची कथा मुंबईत घडणार आहे आणि श्रेयस एका सामान्य माणसाची भूमिका साकारणार आहे." यामुळे श्रेयस तळपदेच्या चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. श्रेयसच्या दमदार अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. श्रेयस तळपदेने मराठीसोबत हिंदीतही चांगले काम केले आहे.

पलाश मुच्छल हा एक उत्तम गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक आहे. त्याने 'भूतनाथ रिटर्न्स' सारख्या चित्रपटांसाठी संगीत दिले आहे आणि अनेक लोकप्रिय गाणी देखील लिहिली आहेत. पलाशच्या नवीन चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. मात्र अद्याप चित्रपटाचे शीर्षक, इतर कलाकारांची नावे आणि प्रदर्शन तारीख समोर आली नाही.

Palash Muchhal New Project
Vivek Oberoi : विवेक ओबेरॉय अडचणीत; ३४ कोटींच्या हिरे घोटाळ्याप्रकरणी चौकशी, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com