India Tourism : भारतातील 'हे' ठिकाण जणू पॅरिसच; हनिमूनसाठी रोमँटिक डेस्टिनेशन

Shreya Maskar

जयपूर

जयपूर हे भारताच्या राजस्थान राज्याची राजधानी आहे, जे 'गुलाबी शहर' (Pink City) म्हणून प्रसिद्ध आहे.

Jaipur | yandex

सुवर्ण त्रिकोण

जयपूर 'सुवर्ण त्रिकोणाचा (Golden Triangle)' भाग आहे, ज्यात दिल्ली, आग्रा आणि जयपूर या तीन प्रमुख पर्यटन स्थळांचा समावेश होतो.

Jaipur | yandex

भारतातील पॅरिस

जयपूर हे शहर त्याच्या सुंदर राजवाडे, हवेली आणि नियोजित रचनेमुळे 'भारताचे पॅरिस' म्हणून ओळखले जाते.

Jaipur | yandex

सिटी पॅलेस

जयपूरमध्ये हवा महल, सिटी पॅलेस, आमेर फोर्ट, नाहरगड किल्ला आणि जंतर मंतर यांसारखी अनेक ऐतिहासिक आणि सुंदर ठिकाणं आहेत, जी जयपूरच्या समृद्ध वारशाची ओळख करून देतात.

Jaipur | yandex

गुलाबी शहर

स्टॅनली रीड यांनी जयपूरला 'गुलाबी शहर' हे नाव दिले होते, कारण महाराजा राम सिंह यांनी प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागतासाठी १८७६ मध्ये शहराच्या इमारती गुलाबी रंगाने रंगवल्या होत्या.

Jaipur | yandex

कोणी बांधले?

महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी १७२८ मध्ये जयपूर शहराची स्थापना केली आणि त्याला आपली राजधानी बनवले. हे शहर विद्याधर भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुनियोजित शहर म्हणून वसविले गेले.

Jaipur | yandex

वास्तुकला

जयपूर हे अद्वितीय वास्तुकलेसाठी ओळखले जाते आणि येथील बिर्ला मंदिर (लक्ष्मी नारायण मंदिर) पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरी दगडाने बांधलेले आहे. जे शांतता आणि अध्यात्मिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे

Jaipur | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Jaipur | yandex

NEXT : कुछ तुफानी करते है; पुण्यात 'हे' ठिकाण साहसप्रेमींसाठी नंदनवन, ट्रेकिंगला नक्की जा

Pune Tourism | SAAM TV
येथे क्लिक करा...