Sakshi Sunil Jadhav
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक पदव्या देताना ऐकलं असेल.
पण छत्रपती शिवाजी महाराजांना चाफा म्हटंल्याचे ऐकलंय का?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातले राजकवी भूषण यांनी 'चाफा' ही पदवी एका कवीतेच्या माध्यमातून दिली आहे.
कुरम कमल कमधुज है कदम फुल या कवितेच्या सुरवातीच्या ओळी आहेत.
भूषण महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना चाफ्याच्या फुलाशी तुलना करून त्यांच्या तेज, पवित्रतेचा, आणि आदर्शत्वाचा गौरव केला आहे.
चाफा हे फुल सुगंधी, देखणं आणि नेहमी लक्ष वेधणारं असतं शिवरायांचं व्यक्तिमत्त्वही अगदी असंच आहे.
भुंगा (म्हणजे माशी) या प्रतिमेचा वापर औरंगजेबासाठी करून, भूषण यांनी त्याच्या अत्याचारी, कुरूप स्वभावाचे प्रतीक दाखवले आहे.
भुंगा हा चाफ्याच्या फुलांच्या आसपास सुद्धा फिरकत नाही. त्याचप्रमाणे औरंगजेब सुद्धा महारांज्याच्या वाटेला गेला नाही.