Uttar Pradesh Crime Saam Tv
क्राईम

Crime: IPS अधिकाऱ्याच्या आईची हत्या, घरामध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या आईची निर्घृण हत्या करण्यात आली. घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला.

Priya More
  1. उत्तर प्रदेशमध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या आईची हत्या

  2. घरात घुसलेल्या चोरट्यांनी गळा दाबून संपवलं

  3. उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमध्ये घडली घटना

  4. घरातील पैसे आणि दागिने लंपास

उत्तर प्रदेशमध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या आईची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. आयपीएस अधिकारी आशुतोष मिश्रा यांच्या आईच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली. आंबेडकर नगरच्या मालिपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुधा धामरुआ गावात ही घटना घडली. त्यांच्या घरात चोर घुसले होते. त्यांनी आशुतोष मिश्रा यांच्या आईची हत्या करुन घरातील पैसे आणि दागिने घेऊन ते लंपास झाले. पोलिस सध्या या हत्याकांडाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएस आशुतोष मिश्रा यांची आई एकट्याच घरामध्ये राहत होत्या. रविवारी रात्री त्यांच्या घरात चोर शिरले. त्यांनी त्यांच्या तोंडात कापड कोंबले आणि गळा दाबून त्यांची हत्या केली. रविवारी दुपारी घरकाम करणारी बाई आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ९४ वर्षीय इंद्रावती यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्यांचे दागिने गायब झाले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी हत्याचा संशय व्यक्त केला. आशुतोष मिश्रा यांना याबाबत त्यांच्या काकांनी माहिती दिली.

आशुतोष मिश्रा यांच्या काकांनी सांगितले की, आशुतोष मिश्रा लखनऊवरून आंबेडकरनगरला गेले होते. आशुतोष यांच्या आईच्या मृतदेहावरील दागिने गायब होते. सोन्याच्या मण्यांची तुळशीची माळ गायब होती. नाकातली नथ आणि कानातलेही गायब होते. पायातील पैंजणही गायब होते. मालिपूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संपूर्ण तपास शवविच्छेदन अहवालावर अवलंबून आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT