unidentified person looted senior citizens gold worth rs 50 thousand in dharashiv  Saam Digital
क्राईम

CBI अधिकारी असल्याचे सांगत वृद्धाचे 50 हजार रुपयांचे साेनं केलं लंपास, समता काॅलनीत खळबळ

unidentified person looted senior citizens gold worth rs 50 thousand in dharashiv: प्रकाश पंरडेकर (वय 70) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार आनंदनगर पोलिसांनी कलम 420 अन्वये अज्ञातांवर गुन्हा नोंदवला आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

सीबीआय अधिकारी आहे असे सांगत एकाने ज्येष्ठ नागरिकाचे 50 हजार रुपयांचे सोने लंपास केल्याची घटना धाराशिव शहरातील समता कॉलनी येथे घडली. या घटनेनंतर ज्येष्ठ नागरिकाने आनंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पाेलिसांनी अज्ञातावर गुन्हा नाेंदविला आहे.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार समता काॅलनी येथील प्रकाश परंडेकर हे आपल्या घराच्या गेटजवळ थांबले हाेते. त्यावेळी त्यांच्याकडे एक अनोळखी व्यक्ती आली. त्यांनी मी सीबीआयमध्ये पोलिस आहे असे सांगितले. सुरक्षेसाठी तुमच्याकडील साेनं, अंगठ्या माझ्याकडे द्या अशी मागणी केली.

त्यानंतर परंडेकर यांनी त्यांच्या बोटातील सोन्याच्या अंगठ्या अज्ञातांना दिल्या. परंडेकर यांच्या फिर्यादीनूसार दोन सोन्याच्या अंगठ्या एकुण 50,000 रुपये किंमतीच्या हाेत्या. आनंदनगर पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kandi Pedha Recipe : साताऱ्याचा स्पेशल कंदी पेढा घरी कसा बनवावा? वाचा सीक्रेट रेसिपी

Filmcity Makeup Artist : मुलीमुळे आईचा झाला भंडाफोड, आर्टिस्ट नवऱ्याला संपववलं होतं, पत्नी-प्रियकराच्या कटाचा पर्दाफाश

Bigg Boss 19 : मराठमोळ्या अभिनेत्याची सलमान खानच्या 'बिग बॉस 19'मध्ये एन्ट्री? स्वत:च केला खुलासा

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाच्या आमदाराला राधाकृष्ण विखे पाटील यांची महायुतीत येण्याची खुली ऑफर

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का! खासदार विशाल पाटलांच्या कट्टर समर्थकांचा भाजपात प्रवेश

SCROLL FOR NEXT