Rasta Roko Andolan: शेतक-यांच्या मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक, वाशिममधील महत्त्वाचे मार्ग राेखले

farmers rasta roko at karanja risod washim: रिसोड येथील महत्त्वाचा मार्ग असलेल्या लोणी फाटा आणि वाशिम शहरातून जाणाऱ्या नांदेड - अकोला महामार्गावरील अकोला नाका शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
farmers rasta roko at karanja risod washim
farmers rasta roko at karanja risod washimSaam Digital
Published On

- मनोज जयस्वाल

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज (साेमवार) वाशिम जिल्ह्यात तीन ठिकाणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदाेलनामुळे तिन्ही मार्गावरील वाहतूक काही काळ खाेळंबली हाेती.

farmers rasta roko at karanja risod washim
Ashadhi Wari 2024: प्रेमविवाहास कुटुंबाचा विराेध, उच्चशिक्षित युवतीचे माऊलींना साकडे; दानपेटीत सापडलेल्या चिठ्ठीत काय लिहिलेय?

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनास दिलेल्या निवेदनात एप्रिल 2024 कालावधीत उन्हाळी नुकसानीचे शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करण्यात यावे, भावांतर योजनेअंतर्गत सोयाबीनला भाव देण्यात यावा, स्प्रिंकलचे सबसिडीची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ जमाा करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना कर्ज देण्यास खाजगी शासकीय व राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करीत असल्याने दिरंगाई व टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई व्हावी या मागण्या करण्यात आल्या आहेत.

farmers rasta roko at karanja risod washim
कांदा खरेदीची ईडी, सीबीआय चाैकशी व्हावी, शेतकरी संघटनेचा काेट्यावधींच्या घाेटाळ्याचा आराेप (पाहा व्हिडिओ)

दरम्यान भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रिसोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी आंदाेलनस्थळी येऊन भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, राज्य प्रवक्ते डॉ. जितेंद्र गवळी, राहुल बोडखे, युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे रवींद्र चोपडे, विकास झुंगरे, जालिंदर देवकर, संजय सदर, गजानन जाधव, रवी जाधव, श्रीरंग नागरे, वैजनाथ रंजवे, बबलू खरात, विनायक शिंदे, पप्पू हेंद्रे, संतोष अण्णा घोडके, गजानन सदर, पुरुषोत्तम रंजवे, दिलीप भांदुर्गे, अरबी खडसे, सय्यद अजमत, हरी बाजड, जगन्नाथ गरकळ , विष्णू कायंदे, विष्णू सरकटे, नितीन खरात, सचिन खरात यांच्यासह भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

farmers rasta roko at karanja risod washim
पाण्याचे दुर्भिक्ष! उपक्रमशील शेतीतून मिळविले भरघोस उत्पन्न; वाचा नांदेड, परभणीच्या शेतक-यांची Success Story

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com