BJP Politics  Saam tv
क्राईम

BJP Leader Case: भाजपच्या बड्या नेत्याची हत्या, पेट्रोल टाकून जिवंत जाळलं; राजकीय वर्तुळात खळबळ

Chhattisgarh Crime: छत्तीसगडमध्ये वाळू उत्खननावरून झालेल्या वादातून भाजप नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्याच कारमध्ये त्यांना पेटवून देण्यात आले.

Priya More
  • छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याची हत्या करण्यात आली

  • भरत सिंह गहरवार यांची निर्घृण हत्या करण्यात आली

  • वाळू उत्खननाच्या जुन्या वादातून घडली घटना

  • आरोपींनी कारवर पेट्रोल टाकून भाजप नेत्याला जिवंत जाळलं

छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. कोरिया जिल्ह्यात वाळू उत्खननावरून झालेल्या वादाला मंगळवारी रात्री उशिरा हिंसक वळण आले. त्यानंतर काही नागरिकांनी भाजप नेत्याला त्यांच्याच कारमध्ये जिवंत जाळलं. सोनहटमधील कटगोडी गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून घटनास्थळी तणावाचे वातावरण आहे.

भरत सिंग गहरवार उर्फ लल्ला सिंग असं हत्या करण्यात आलेल्या भाजप नेत्याचे नाव होते. पोलिसांनी या प्रकरणी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलिस सध्या या हत्याकांडाचा तपास करत असून सर्व पैलूंचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे छत्तीसगड हादरले आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्याच्या नातेवाईकांनी केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, ही घटना मंगळवारी रात्री उशिरा ११ वाजताच्या सुमारास घडली. भरत सिंग गहरवार आणि त्यांचे साथीदार हे कारमधून नवगई गावाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी आरोपींनी भाजप नेत्याच्या कारला टिपरने अनेक वेळा धडक दिली. त्यानंतर त्यांनी भाजप नेत्याच्या कारवर पेट्रोल टाकून आग लावून दिली. टिपरने वारंवार धडक दिल्यामुळे भाजप नेत्याच्या कारचे दरवाजे लॉक झाले. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं.

कारमध्ये असलेल्या इतरांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर आरोपींनी त्यांना मारहाण देखील केली असा आरोप केला जात आहे. या घटनेमध्ये भाजपचे नेते भरत सिंग गंभीररित्या भाजले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमध्ये असलेले इतर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी भाजप नेत्याचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी याप्रकरणी मनोज त्रिपाठी आणि निशांत त्रिपाठी यांच्यासह ४ आरोपींना अटक केली. तर इतर संशियितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी भाजपशी संबंधित असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.

तपासातून असे समोर आले की, हत्या करण्यात आलेल्या भरत सिंग आणि आरोपी मनोज त्रिपाठी यांच्यात वाळूच्या व्यवसायावरून जुना वाद होता. मंगळवारी दुपारी दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्याच रात्री उशिरा भरत सिंग आणि त्याचे साथीदार हे आरोपींना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी पुन्हा वाद झाला आणि यातूनच आरोपींनी भाजप नेत्याला संपवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: "जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही!" – तुपकरांचा सरकारला इशारा

हायवेवर दिसणाऱ्या पिवळ्या आणि पांढऱ्या रेषांचा अर्थ माहितीये का?

Political News : आणखी एक पक्ष फुटणार, बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Famous Bodybuilder Death: प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा २६ व्या वर्षी हार्ट अटॅकने मृत्यू, आईच्या डोळ्यांसमोर घेतला अखेरचा श्वास

Gold Price Today: सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण! 24k, 22k, 18k ची प्रति तोळा किंमत किती?

SCROLL FOR NEXT