

ठाकरे गटातील ६ खासदारांनी दिल्लीत स्वतंत्र गट स्थापन केला.
भाजपने या फुटीमध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचा दावा केला.
पक्षांतर्गत नाराजी हे ऑपरेशन टायगरमागील मोठं कारण असल्याची चर्चा
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती. आज ठाकरेंचे ६ खासदारांनी दिल्ली गाठत थेट दुसरा वेगळा गट स्थापन केला. ऑपरेशन टायगर भाजप आणि शिवसेनेने घडवून आणल्याची चर्चा आहे. त्यावर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. खासदार पळवण्यामागे भाजप आणि शिवसेनेचा हात नसल्याचं भाजप नेत्यानं सांगितलंय. त्यामुळे आता ठाकरे गटातील फुटीमागे कोणाचा हात? ऑपरेशन टायगर का घडलं? त्यामागे कारण काय हे जाणून घेऊ.
ऑपरेशन टायगरमागे भाजप आणि शिवसेनेचं नाव येत असल्यानं भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी खडेबोल सुनावलेत. त्यांनी संजय राऊत यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला. 'ऑपरेशन टायगर'शी भाजप आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही तर 'ऑपरेशन टायगर' उबाठातील अंतर्गत शीतयुद्ध आणि वादामुळे होत आहे.
संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा वापरतात, त्यामुळेच हे घडत आहे. राऊतांना खासदारसोबत ठेवता येत नाही. त्यांचे विचार त्यांना त्यांच्यासोबत ठेवता येत नसल्याने उबाठा गटाची ही अवस्था झाली. पक्षात संजय राऊत दादागिरी करत असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला आहे. कोणाला धमकावत असाल तर जशास तसे उत्तरही दिले जाईल, असा घणाघात भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. ते आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
आई-बाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन माणसे टिकवता येत नाहीत, पक्ष वाढवता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवली असती तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ आली नसती. असंही भाजप प्रवक्ते बन म्हणालेत. खासदार, आमदार का सोडून जात आहेत? उद्धव ठाकरेंनी सु्द्धा बाळासाहेब ठाकरेंचे विचार, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि ते काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसलेत. येत्या काळात ठाकरे गटाची आणि संजय राऊत यांची यापेक्षाही वाईट अवस्था होणार असल्याचा दावा भाजप नेत्यानं केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.