खासदार ओमराजे निंबाळकर कोणत्या कारणामुळे फुटीर झाले? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Sanjay Raut Comment On MP Omraje Nimbalkar : ठाकरे गटातील सहा खासदारांच्या फुटीनंतर संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला. फुटीर खासदारांना प्रत्येकी १५ कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.
Sanjay Raut Comment On MP Omraje Nimbalkar
SANJAY RAUT'S SHOCKING REVELATION: WHY OMRAJE NIMBALKAR REBELLED AND ₹15 CRORE CLAIMSaamtv
Published On
Summary
  • ओमराजे निंबाळकर फुटीमागचे कारण काय

  • संजय राऊतांचा १५ कोटींचा खळबळजनक दावा

  • फुटीर खासदारांवर ठाकरे गटाची कारवाई

सहा खासदारांना वेगळा गट स्थापन करण्यास लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली असून ते सर्व खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा आहे. या सर्व राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. हे सहाही खासदार मंगळवारी सायंकाळी आणि मध्यरात्रीपर्यंत विविध मार्गाने दिल्लीला रवाना झाले होते.

Sanjay Raut Comment On MP Omraje Nimbalkar
६ खासदारांनी साथ सोडली, आता पुढे काय कारवाई करणार? अरविंद सावंतांनी सांगितला सगळा प्लॅन

या सगळ्या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे यांनी दिल्लीत एकत्रित बैठक घेतली. या बैठकीतून संजय राऊतांनी फुटीर गटाला अप्रत्यक्ष कारवाईचा इशारा दिला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी खळबळजनक दाव्या केले आहेत, फुटीर खासदारांना मंगळवारी रात्री प्रत्येकी १५ कोटी रुपये देण्यात आले. त्यानंतर ते सर्वजण दिल्लीत गेले, असा दावाही राऊतांनी केला.

यासह संजय राऊत यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कसल्या प्रकारचा दबाव होता, याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. वीस वर्षापूर्वी त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली होती. २० वर्षापासून हा खटला मुंबई हायकोर्टात सुरू आहे. काल यावर निकाल होता. मुंबई हायकोर्टात निकालाचा दिवस ठरला पण अचानक पुढे ढकलण्यात आला."

Sanjay Raut Comment On MP Omraje Nimbalkar
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; फुटीर ६ खासदार शिवसेनेत विलीन होणार!

संजय राऊत यावर बोलताना अजून एक धक्कादायक खुलासा केला. ओमराजेंना एका व्यक्तीकडून निकालाबाबत एक संदेश देण्यात आला. जर तुमच्या बाजुने निकाल हवा असेल, तर आमच्या गटात सामील व्हा, आम्ही तुम्हाला हवा तसा निकाल देतो. असा संदेश ओमराजेंना देण्यात आला. हा निकाल तुमच्या बाजुने हवा असेल तर तर स्वाक्षरी करा आणि आमच्यासोबत या, असे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com