Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; फुटीर ६ खासदार शिवसेनेत विलीन होणार!

Maharashtra Politics : ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. यामुळे शिवसेनेत विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Maharashtra Politics :
UDDHAV THACKERAY SUFFERS BIG BLOW AS 6 REBEL MPS OFFICIALLY MERGE WITH SHIV SENAsaam tv
Published On
Summary
  • ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मान्यता मिळाली.

  • सहा खासदार अधिकृतपणे शिवसेनेत विलीन झाले.

  • उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिल होतं. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजूरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेला प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली. आता त्या खासदाराचा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Maharashtra Politics :
६ खासदारांनी साथ सोडली, आता पुढे काय कारवाई करणार? अरविंद सावंतांनी सांगितला सगळा प्लॅन

काल रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक-एक करुन दिल्लीत दाखल झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. काहीवेळापूर्वीच या सहा बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेत आपला स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र सादर केलं. लोकसभा अध्यक्षांच्यादेखत बंडखोर खासदारांनी पत्रावर सह्या केल्या. त्यामुळे या खासदारांच्या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली.

Maharashtra Politics :
Maharashtra Politics: आता राडा होणारच, राज्य गप्प बसणार नाही; संजय राऊतांचा फुटीर खासदारांना इशारा

खासदारांच्या गटाला अधिकृत मंजुरी?

पक्षांतरबंदी कायद्यानुसार, स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आमदार किंवा खासदार संख्येच्या एकूण संख्याबळाच्या दोन तृतीयांश संख्याबळाची गरज असते. ठाकरे गटाचे एकूणद ९ खासदार आहेत. यापैकी ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे या गटाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती. मात्र दिल्लीतील भाजपश्रेष्ठींना या ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिला नव्हता. अखेर 10 जून रोजी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीनंतर अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करुन या ऑपरेशनला ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com