Pune Fake Lady Police Arrested: पुण्यात 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश! तरुणीकडून दोन पोलिस गणवेश जप्त

Pune Fake Lady Police Officer Arrested: पुण्यात पोलिस उपनिरीक्षकाचा गणवेश परिधान करून डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली. तिच्याकडून दोन पोलिस गणवेश जप्त करण्यात आले.
Pune Fake Lady Police Arrested
Pune Fake Lady Police ArrestedSaam Tv
Published On

Pune Fake Lady Police Officer Arrested: पुण्यात पोलिसांच्या वर्दीत फिरत नागरिकांवर रुबाब दाखवणाऱ्या एका तोतया महिला पोलिस अधिकाऱ्याचा भांडाफोड झाला आहे. लष्कर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी २५ वर्षीय तरुणीला अटक केली असून तिच्याकडून पोलिसांच्या दोन वर्दीचे सेट जप्त करण्यात आले आहेत. या घटनेमुळे खऱ्या पोलिसांनाही धक्का बसला असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. ती पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा गणवेश परिधान करून पुण्यातील कॅम्प परिसरात फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक चौकशीत तिने एका नामांकित खासगी क्लिनिकमध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी पोलिसांचा गणवेश परिधान केल्याची कबुली दिली आहे.

Pune Fake Lady Police Arrested
Madhuri Dixit House: म्युझिक रूमपासून महागड्या पेंटिंग्सपर्यंत; माधुरी दीक्षितच्या आलिशान घराची झलक पाहिलीत का?

मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी लष्कर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे हे कॅम्प परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका खासगी क्लिनिकबाहेर पोलिसांच्या वर्दीत उभी असलेली महिला त्यांच्या नजरेस पडली. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिची चौकशी सुरू केली.

Pune Fake Lady Police Arrested
Crime News: ४० कोटींचा जमीन व्यवहार; वादानंतर महिला वकिलाची आत्महत्या, ज्येष्ठ वकील आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल

चौकशीदरम्यान संबंधित महिलेला ती कोणत्या पोलिस ठाण्यात कार्यरत आहे, तिचे ओळखपत्र कुठे आहे आणि इतर पोलिसी कामकाजासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आले. मात्र, पोलिसी भाषेची माहिती नसल्याने आणि उत्तर देताना ती गोंधळल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. सखोल चौकशी केल्यानंतर ती खऱ्या अर्थाने पोलिस कर्मचारी नसून तोतया असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी तिची झडती घेतली असता तिच्याकडे पोलिसांच्या वर्दीचे दोन संच आढळून आले. हे गणवेश तिने कुठून मिळवले, त्यांचा वापर करून तिने यापूर्वी काही लाभ घेतले आहेत का, तसेच इतर कोणाला फसवले आहे का, याचा तपास आता सुरू आहे. अशी माहिती, पोलिस उपआयुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, समिना हिचे पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही. सध्या ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. डॉक्टरांची वेळ मिळत नसल्याने तिने पोलिस असल्याचा दबाव निर्माण करून अपॉइंटमेंट मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा हा बनाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आणि अखेर तिला अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com