Shruti Vilas Kadam
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आणि पती डॉ. श्रीराम नेने यांचे सुंदर आणि आलिशान घर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. घरातील लक्झरी इंटिरियर चाहत्यांना भुरळ घालत आहे. मुंबईत तिचे ५३ व्या मजल्यावर आलिशान घर आहे.
माधुरीच्या घरात प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या महागड्या आणि आकर्षक पेंटिंग्स लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरात कलात्मकता आणि अभिरुचीची खास झलक पाहायला मिळते.
घरातील खास म्युझिक रूम हे या आलिशान घराचे प्रमुख आकर्षण आहे. संगीत आणि रियाजासाठी तयार केलेली ही जागा शांत, सुंदर आणि प्रेरणादायी वातावरणाने सजलेली आहे.
घराच्या इंटिरियरमध्ये आधुनिक आणि पारंपरिक डिझाइनचा सुंदर समतोल साधण्यात आला आहे. प्रत्येक कोपऱ्यात रॉयल आणि एलिगंट लुक पाहायला मिळतो.
माधुरी आणि श्रीराम नेने यांनी आपल्या मुलांसाठीही घरात स्वतंत्र आणि आरामदायी जागा तयार केली आहे. स्टायलिश डेकोरेशनमुळे घरातील प्रत्येक भाग अधिक आकर्षक दिसतो.
मोठ्या काचांच्या खिडक्या आणि नैसर्गिक प्रकाशामुळे घर अधिक प्रशस्त आणि सुंदर दिसते. साधेपणा आणि लक्झरीचा उत्तम मिलाफ घराच्या सजावटीत दिसून येतो.
माधुरी दीक्षित अनेकदा सोशल मीडियावर घरातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या घरातील प्रत्येक गोष्ट तिच्या उत्कृष्ट अभिरुचीची आणि लक्झरी लाइफस्टाइलची झलक दाखवते.