Shruti Vilas Kadam
साडी वापरल्यानंतर काही तास हवेत ठेवा. त्यामुळे घाम, परफ्यूम आणि ओलावा निघून जातो व साडी खराब होण्याचा धोका कमी होतो.
जड सिल्क किंवा झरीच्या साड्या प्लास्टिकमध्ये ठेवू नयेत. मलमलच्या कापडात गुंडाळल्याने साडीचा रंग आणि चमक टिकून राहते.
सतत एकाच घडीत ठेवलेल्या साड्यांवर कायमच्या क्रिज पडू शकतात. त्यामुळे झरी आणि भरतकाम खराब होण्याची शक्यता वाढते.
भरतकाम, सिक्विन किंवा स्टोनवर्क असलेल्या साड्या इतर कपड्यांपासून वेगळ्या ठेवल्या तर घर्षणामुळे होणारे नुकसान टाळता येते.
हलके फॅब्रिक असलेल्या साड्या पॅडेड हॅंगरवर टांगू शकता. मात्र जड झरीच्या साड्या टांगल्यास त्यांचा आकार बिघडू शकतो.
ओलसर कपाटात साड्या ठेवल्यास बुरशी आणि दुर्गंधी येऊ शकते. कपाटात नीमची पाने किंवा सिलिका जेल ठेवणे फायदेशीर ठरते.
खूप जड बॉर्डर किंवा भरतकाम असलेल्या साड्या रोल करून ठेवल्यास फोल्डच्या खुणा पडत नाहीत आणि साडीची गुणवत्ता टिकून राहते.