Mumbai Crime Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: शरीरसंबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, ब्लॅकमेलिंग करत ३ कोटी उकळले; मुंबईत CAची आत्महत्या

Mumbai Police: मुंबईमध्ये भयंकर घटना घडली. शरीरसंबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सीएकडून पैसे उकळले आणि त्याला मारहाण केली. या त्रासाला कंटाळून सीएने आत्महत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली.

Priya More

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये चार्टर्ड अकाऊंटेंटने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शारीरिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीने तिच्या मित्रासोबत या चार्टर्ड अकाऊंटेंटकडून तब्बल ३ कोटी रुपये उकळले. पैशांसाठी सीएला मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली होती. या सर्व त्रासाला कंटाळून या चार्टर्ड अकाउंटेंट तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. शारीरिक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीने आणि तिच्या मित्राने चार्टर्ड अकाउंटेंटकडून तब्बल तीन कोटी रुपये उकळले. राज मोरे असे आत्महत्या करणाऱ्या चार्टर्ड अकाऊंटेंट तरुणाचे नाव आहे. सांताक्रुज पूर्वेकडील वाकोल्यातील ते नामांकित चार्टर्ड अकाउंटेंट होते.

फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीसोबत राज मोरे यांनी शारीरिक संबंध ठेवले. या तरुणीने आणि तिच्या मित्राने शरीरसंबंधाचे व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओद्वारे ते राज मोरे यांना सतत त्रास देत होते. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोघे त्यांच्याकडून सतात पैसे घेत होते. १८ महिन्यात त्यांनी राज मोरे यांच्याकडून तीन कोटी रुपये उकळले.

आरोपींनी चार्टर्ड अकाउंटेंट राज मोरे यांना त्याच्या कुटुंबीयांसमोरच शिवीगाळ करून मारहाण केली होती. मानसिक छळाला कंटाळलेल्या चार्टर्ड अकाउंटेंटने विष पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी राज मोरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या दोघांची नावे लिहिली. याच चिठ्ठीवरून वाकोला पोलिसांनी आत्महत्या प्रवृत्त करणे, खंडणी आणि ब्लॅकमेलिंग या कलमांतर्गत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unnao Hit-and-Run: आमदाराच्या कारने दुचाकीस्वाराला उडवलं; रेल्वे पुलावरून खाली कोसळून भाजप नेत्याच्या भावाचा मृत्यू

Shocking : धक्कादायक! एम्समधील नर्सच्या दोन चिमुकल्यांना घरात जिवंत जाळलं; आईनं हंबरडा फोडला

Maharashtra Live News Update: एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक, सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त

Shocking : २८ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक; धक्कादायक कारण समोर

Beed News: बीडचं बिहार होतंय? मित्रानेच मित्राची बोट छाटली

SCROLL FOR NEXT