Urmila Matondkar: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बद्दल अश्लील फेसबुक पोस्ट करणाऱ्यावर पुण्यात गुन्हा दाखल

Urmila Matondkar: अभिनेत्री आणि राजकारणी उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात फेसबुकवर अश्लील आणि अपमानास्पद भाषेत पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Urmila Matondkar
Urmila MatondkarSaam Tv
Published On

Urmila Matondkar: अभिनेत्री आणि राजकारणी उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात फेसबुकवर अश्लील आणि अपमानास्पद भाषेत पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात मोठा संताप निर्माण झाला असून, अनेक महिला कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

धनंजय व्यंकटेश कुडतरकर (वय ५७, रा. बुधवार पेठ, पुणे) असे आरोपीचे नाव असून त्याने सोशल मीडियावर उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात अतिशय अश्लील, अवमानकारक आणि महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारी पोस्ट शेअर केल्याचा आरोप आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रुपाली चंद्रशेखर पाटील यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.

Urmila Matondkar
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूचे शॉकिंग ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते थक्क; म्हणाले, 'ऑपरेशन की डाईट...'

या प्रकारानंतर शहरातील महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी आरोपीला त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. महिला कार्यकर्त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट समाजात महिलांबद्दल द्वेष पसरवण्याचे काम करतात आणि त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ आणि ठोस कारवाई करावी.

Urmila Matondkar
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूचे शॉकिंग ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते थक्क; म्हणाले, 'ऑपरेशन की डाईट...'

विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीचा मोबाईल तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, सोशल मीडियावरील त्याचे इतर पोस्टही तपासले जात आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपीला लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हा प्रकार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या समर्थकांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे कारण ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com