Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूचे शॉकिंग ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते थक्क; म्हणाले, 'ऑपरेशन की डाईट...'

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिच्या अलीकडील वजन घटण्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंता आणि आश्चर्याची लाट उसळली आहे.
Samantha Ruth Prabhu
Samantha Ruth PrabhuSaam Tv
Published On

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिच्या अलीकडील वजन घटण्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंता आणि आश्चर्याची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर तिच्या नवीन लुकबद्दल चर्चा रंगली असून, अनेकांना तिला ओळखताही येत नाहीये. या चर्चांना उत्तर देताना, सामंथाने स्वतः खुलासा केला आहे की तिच्या या शारीरिक बदलामागे एक दुर्मिळ ऑटोइम्यून आजार – मयोसिटिस आहे.

सामंथाने २०२२ मध्ये इन्स्टाग्रामवरून जाहीर केलं की ती मयोसिटिस या आजाराने ती ग्रस्त आहे. या आजारात स्नायूंमध्ये सूज येते, ज्यामुळे थकवा, वेदना आणि अशक्तपणा जाणवतो. या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिला अँटी-इन्फ्लेमेटरी डाएटचा अवलंब करावा लागतो. या डाएटमुळे तिचं वजन कमी झालं असून, ती खूपच बारिक झाली आहे. या डाएटमध्ये प्रोसेस्ड फूड, साखर, डेअरी आणि अल्कोहोल यांसारख्या सूज वाढवणाऱ्या अन्नपदार्थांना तिने सोडले असून तर फळं, भाज्या, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर अन्नपदार्थांचा समावेश केला जातो.

Samantha Ruth Prabhu
Bhool Chuk Maaf VS Kesari Veer:'भूल चूक माफ'ने चार दिवसात पार केला ३० कोटींचा टप्पा; तर,'केसरी वीर'च्या हाती नाराशा

सामंथाने तिच्या फिटनेसबद्दलही चाहत्यांना माहिती दिली आहे. ती नियमितपणे वर्कआउट करते, ज्यामध्ये एरियल योगा, सायकलिंग, रोप ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग आणि बॉडीवेट एक्सरसाइज यांचा समावेश आहे. तिच्या सोशल मीडियावरून ती तिच्या वर्कआउट्सचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Samantha Ruth Prabhu
Skin Care: पावसाळ्यात केमिकल क्रीमपेक्षा घरी बनवलेले 'ही' फेस क्रीम लावा आणि मिळावा ग्लॉनिंग स्किन

फोटो व्हायरल होताच चाहते तिला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने विचारले तू ऑपरेशन केलं आहेस की डाईट. आणखी एक चाहता म्हणाला, तू खूप सुंदर दिसत आहेसपण जास्त डाईट केलास तर तुला खूप त्रास होईल.

तिच्या वजनावर होणाऱ्या टीकांबाबत सामंथाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, "कृपया लोकांना जज करणं थांबवा. त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून द्या. २०२४ उजाडलं आहे." या वक्तव्यातून ती समाजाला एक महत्त्वाचा संदेश देते – प्रत्येकाच्या आरोग्य प्रवासाची पार्श्वभूमी वेगळी असते, आणि त्याचा आदर केला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com