Bhool Chuk Maaf VS Kesari Veer:'भूल चूक माफ'ने चार दिवसात पार केला ३० कोटींचा टप्पा; तर,'केसरी वीर'च्या हाती नाराशा

Bhool Chuk Maaf VS Kesari Veer Box Office Collection: राजकुमार राव आणि वामीका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'भूल चूक माफ' या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर चार दिवसांत चांगलेच कलेक्शन केले आहे.
Bhool chuk maaf Vs Veer Kesari
Bhool chuk maaf Vs Veer KesariSaam Tv
Published On

Bhool Chuk Maaf VS Kesari Veer Box Office Collection: राजकुमार राव आणि वामीका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'भूल चूक माफ' या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर चार दिवसांत भारतात ३२.७५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने शुक्रवारपासून रविवारपर्यंत चांगली कामगिरी केली, मात्र सोमवारच्या कमाईत घट झाली.

चित्रपटाने शुक्रवारी ७ कोटी, शनिवारी ९.५ कोटी आणि रविवारी ११.५ कोटी अशी कमाई केली. मात्र, सोमवारच्या कमाईत घट होऊन ती ४.७५ कोटी इतकी झाली. या घसरणीनंतरही चित्रपटाने चार दिवसांत एकूण ३२.७५ कोटींची कमाई केली आहे.

Bhool chuk maaf Vs Veer Kesari
Skin Care: पावसाळ्यात केमिकल क्रीमपेक्षा घरी बनवलेले 'ही' फेस क्रीम लावा आणि मिळावा ग्लॉनिंग स्किन

'भूल चूक माफ' ही एक टाइम-लूप कॉमेडी आहे, ज्यात राजकुमार राव आणि वामीका गब्बी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. चित्रपटात संजय मिश्रा, रघुबीर यादव, सीमा पाहवा आणि इतर कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Bhool chuk maaf Vs Veer Kesari
Alia Bhatt Cannes 2025: आलिया भट्टने रचला इतिहास; अभिनेत्रीचा 'गुच्ची साडी' लूक व्हायरल

तर, पहिल्या दिवसापासूनच सुनिल शेट्टीच्या 'केसरी वीर'च्या कमाईने निर्मात्यांना निराश केले आहे. बॉक्स ऑफिसची अवस्था अशी आहे की चित्रपट त्याचे बजेट ६० कोटी देखील वसूल करू शकणार नाही. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, चित्रपटाने चौथ्या दिवशी ०.०१ कोटी रुपये कमावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com