Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Mumbai Crime news : डेटिंग अॅपवरून ओळख झाल्यानंतर हॉटेलमध्ये भेटायला गेलेल्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. हा तरुण बोरिवली येथील होता.
mumbai Crime
dating app scam Saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

डेटिंग अ‍ॅपवर बनावट मुलीचे प्रोफाइल तयार करून भावनिक नात्याचा आधार घेत लोकांना हॉटेलमध्ये बोलावून त्यांच्याकडून हजारो रुपयांचे बिल भरायला लावणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबईच्या एमएसबी कॉलनी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लोकप्रिय डेटिंग अ‍ॅपवर बनावट प्रोफाइल तयार करून ही टोळी ‘द टाईम्स स्क्वेअर’ हॉटेलमध्ये भेटायला बोलावये. त्यानंतर दारू आणि जेवणाचे अवास्तव बिल ग्राहकांकडून वसूल करत होती. या प्रकरणी २२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २९ मोबाइल, ७ मोबाइल पॉवर बँक, ९ डेबिट कार्ड, २ स्वाईप मशीन आणि २,९८००० रुपये जप्त करण्यात आले आहेत. सध्या आरोपी एम एस बी कॉलनी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांनी अजून किती लोकांना अशा प्रकारे फसवले आहे याबाबतचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरेश श्रीकृष्ण परब वय-२७ वर्षे याने डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणीची ओळख वाढवली. त्या तरुणीने गौरे सोबत संपर्क साधून त्याला बोरीवली पश्चिम परीसरातील 'द टाईम्स स्क्वेअर' हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. त्याचासोबत ड्रिंक पिण्याचा बहाणा करुन दोन तास बोलत बसल्यानंतर हॉटेलमधील मॅनेजरच्या मदतीने एकूण ३५,०००/- रु. चे बनावट बिल तयार केले. त्यानंतर त्याचाकडून १४,७००/- रुपये आरोपींनी हॉटेलच्या बँकखात्यावर जमा न करता मोबाईलमधील दोन क्यू आर कोडच्या सहाय्याने आक्रम खान आणि मोह. तालिब या नावाने ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. याबाबत गौरेश याने एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

mumbai Crime
Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

गौरेशच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन विविध अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीने दिलेल्या जुजबी माहीतीवरुन पाहीजे आरोपीचे लोकेशन तांत्रिक आणि मानवी कौशल्य वापरुन पोलिसांनी शोधून काढले.

गुन्हयातील तांत्रिक तपासात आरोपी हे सध्या दिघा, नवी मुंबई येथे असल्याची खात्री पटल्याने एमएचबी कॉलनी पोलीस ठाणेच्या पथकाने तात्काळ आरोपी असलेल्या ठिकाणी पोचून तेथील वेगवेगळया हॉटेलमध्ये भेट देवून तपासणी केली.

आरोपी हे हॉटेल ग्रॅड इन येथे राहण्यास असल्याचे समजले. हॉटेलच्या कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता आरोपी या हॉटेलमध्ये मागील ८ ते १० दिवसांपासून जवळपास १८ ते २० लोक दिल्ली, गाजियाबाद, उत्तरप्रदेश या ठिकाणावरुन येवून वास्तव्य करीत असल्याची माहीती मिळाली.

सर्वजण हॉटेलच्या बाहेर गेले असल्याचे समजताच तब्बल १२ तास पोलीस पथकाने हॉटेलच्या आजू बाजूच्या परिसरात गुप्तपणे आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. पहाटेच्या वेळी एकूण १५ पुरुष ६ मुली हॉटेलमधील एकूण ५ खोल्यांमध्ये परत आले असल्याचे दिसताच पोलिस पथकाने स्थानिक पोलीसांना कळवून हॉटेजमध्ये सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडील सामान, मोबाईल आणि बॅगांची पंचासमक्ष झडती घेतली असता मोहसीन, फरहान हे या टोळीचे प्रमुख असून ते फरार असल्याचे समजले.

mumbai Crime
Language Row : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांची दिलगिरी; मराठी अस्मिता मोर्चाआधीच निर्णय

या टोळीने दिल्ली, गाजियाबाद, उत्तरप्रदेश येथून टोळीतील १३ पुरुष, ६ महिला सदस्यांना मुंबई येथे घेऊन येऊन त्यातील १३ पुरुषांना त्यांचेकडील मोबाईलमध्ये विविध डेटिंग अॅपवर वेगवेगळ्या मुलीच्या नावाने फेक प्रोफाईल आयडी बनवून त्याद्वारे वेगवेगळया पुरुषांसोबत मुलगी असल्याचे भासवून त्याचासोबत चॅटिंग केल्याचे दिसून आले. त्यानंतर चॅटमध्ये मुलीला भेटण्यास उत्सुक असलेल्या पुरूषाला मुलीचा मोबाईल नंबर शेअर करुन त्यांचे संगनमत असलेल्या रेस्टो बार, लॉज यामध्ये भेटायला बोलावत असत.

हॉटेलच्या मॅनेजरसोबत संगनमत करून या टोळीतील सदस्य डेटिंगसाठी गेलेल्या मुलीसोबत ठरलेल्या हॉटेलमध्ये बाउन्सर बनून उपस्थित राहायचे. त्यानंतर तिला भेटायाला आलेल्या तरुणाला महागडे ड्रिंक, स्टार्टर्स, सिगारेट पुरवणे, त्याचाजवळील पोर्टेबल बिल प्रिंटरच्या सहाय्याने अवाजवी बिल बनवून ग्राहकाला रक्कम मोबाईलमधील क्यू आर कोड स्कॅन करायला लावायचे. त्यानंतर रक्कम विविध बँकखात्यावर जमा करुन घेत.

mumbai Crime
Raju Patil : ठाणे ते कल्याणचा प्रवास हेलिकॉप्टरने, रस्त्याने पलावा पूलाची परिस्थिती बघितली असती; राजू पाटलांचा शिंदेंना टोला

त्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम संबधित हॉटेलच्या मॅनेजरला देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण २७ मोबाईल, १ मोबाईल पोर्टेबल प्रिंटर, १ फोनपे स्वाईप मशीन याप्रमाणे एकूण ३,७४,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com