Language Row : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांची दिलगिरी; मराठी अस्मिता मोर्चाआधीच निर्णय

mira-bhayander language row : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे. मराठी अस्मिता मोर्चाआधीच व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
mira-bhayander language News
mira-bhayander language Saam tv
Published On

मनोज तांबे, साम टीव्ही

मीरा-भाईंदर शहरात गुजराती व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीचे देशभरात पडसाद उमटत आहेत. मराठी-हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. मात्र, आज सोमवारी मिरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मराठी अस्मिता मोर्चाआधीच व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मीरा-भाईंदर शहरामध्ये मराठी आणि अमराठी वाद निर्माण झाल्यानंतर राज्यासह देशात याचे पडसाद उमटत आहेत. परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या विरोधात उद्या मंगळवारी मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाच्या भीतीपोटी व्यापाऱ्यांनी लेखी पत्र देऊन पोलिसांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.

mira-bhayander language News
Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

'आम्ही काढलेला मोर्चा मराठी माणूस, मराठी भाषेच्या विरोधात नव्हता. ज्यांनी व्यापाऱ्याला मारहाण केली, त्या व्यक्तीच्या विरोधात असल्याचे पत्रात म्हटले आहे. कोणाच्या भावना दुखावले असतील, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असं लेखी निवेदन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना व्यापारी संघाकडून देण्यात आले.

mira-bhayander language News
Maharashtra Politics : चपलेचा प्रसाद देईल; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदारावर रुपाली ठोंबरे भडकल्या

मीरा-भाईंदर व्यापारी संघाचे दिनेश चौधरी यांनी सांगितलं की, 'मीरा-भाईंदरमध्ये ३ तारखेला जे प्रकरण घडलं. आमचा उद्देश कोणालाही दुखवण्याचा नव्हता. या गोष्टीचं राजकारण झालं. लोकांमध्ये चुकीचा संदेश पसरला गेला. आम्ही सर्व एकोप्याने राहतो. एका व्यापाऱ्यासोबत हा प्रकार घडला होता. प्रशासनाने कारवाईचं आश्वासन दिलं आहे. आमची कोणत्याही पक्षाविरोधात तक्रार नाही. आमच्या व्यापारी भावाला मारहाण झाल्याने मोर्चा काढण्यात आला होता.

mira-bhayander language News
Maharashtra Politics : चपलेचा प्रसाद देईल; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदारावर रुपाली ठोंबरे भडकल्या

'आमचा मोर्चा कोणाच्या विरोधात नव्हता. सर्व व्यापारी घाबरले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं होतं. गुन्हेगारांवर कारवाई व्हावी, हा उद्देश होता. भावना दुखावल्या असतील, तर आम्ही दिलगिरी व्यक्त केली, असे त्यांनी पुढे सांगितलं. परप्रांतीय व्यापाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मराठी भाषिक काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com