Pune Crime  Saam Tv
क्राईम

Pune Crime: मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन..., बायकोने घटस्फोट न घेता दुसऱ्याशीच लग्न केलं, तरुणाने आयुष्य संपवलं

Pune Police: पुण्यामध्ये बायकोने दुसऱ्याशीच लग्न केल्यामुळे तरुणाने आत्महत्या केली. घटस्फोट न घेता या महिलेने लग्न केले. सततच्या धमक्या आणि पैशांची मागणी याला कंटाळून तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवलं.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये बायकोने दुसरं लग्न केल्यामुळे नवऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या बायको आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बायकोने केलेल्या विश्वासघाताने मानसिकदृष्ट्या खचलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडगाव शेरी परिसरात घडली. वडगाव शेरीच्या सोमनाथनगरमधील राहत्या घरात या तरुणाने आत्महत्या केली. बायकोने दुसरे लग्न करून फसवणूक केल्याने आणि धमकी दिल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. सिडनी लॉरेन्स दोरायराज (वय ३९ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी स्वाती सिडनी दोरायराज (वय ३२ वर्षे) आणि तिचा प्रियकर चेतन मोरे (वय ३५ वर्षे) यांच्याविरुद्ध फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपी चेतन मोरे हा गुजरातच्या बडोदामध्ये राहतो. चंदननगर पोलिस या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती आणि सिडनी यांचे लग्न नोव्हेंबर २०१४ मध्ये झाले होते. लग्नानंतर काही वर्षांत स्वातीचे चेतन मोरे याच्याशी प्रेमसंबंध जुळले. कायदेशीर घटस्फोट न घेता स्वाती चेतनसोबत राहू लागली. यानंतर तिने सिडनीला ‘मी परत येणार आहे’, असे सांगून त्याच्याकडून वेळोवेळी १५ लाख १८ हजार रुपये उकळले.

सिडनीने जेव्हा पैसे परत मागितले आणि नांदायला येण्याची विनंती केली तेव्हा स्वातीने त्याला ‘मी तुझ्यावर बलात्कार आणि छळाचा गुन्हा दाखल करीन, तुझ्या घरच्यांना तुरूंगात पाठवीन, आणखी पैसे पाठव’, अशी धमकी दिली. या मानसिक छळामुळे सिडनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT