
गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील ५ जणांनी सामूहिक आत्महत्या केली. गुजरातच्या अहमदाबादमध्ये ही घटना घडल. विष प्राशन करून पाचही जणांनी आयुष्य संपवले. या घटनेमुळे गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये नवरा-बायको, दोन मुली आणि एक मुलगा यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अहमदाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पाचही जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या पाचही जणांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अहमदाबाद ग्रामीण एसपींनी सांगितले की, अहमदाबादमधील बावळा येथे एका भाड्याच्या घरात हे सर्वजण राहत होते. या एकाच कुटुंबातील पाच जणांनी विषारी औषध पिऊन सामूहिक आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हे सर्वजण मूळचे ढोलका येथील रहिवासी होते. मृतांमध्ये विपुल कांजी वाघेला (३४ वर्षे), त्यांची पत्नी सोनल (२६ वर्षे), त्यांच्या दोन मुली (११ वर्षे आणि ५ वर्षे) आणि एक मुलगा (८ वर्षे) यांचा समावेश आहे.
पाच जणांच्या सामूहिक आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घराची झडती घेत आहेत आणि पुरावे गोळा करत आहेत. यासोबतच पोलिस वाघेला यांच्या घराच्या जवळपास राहणाऱ्या लोकांचीही चौकशी करत आहेत. हे कुटुंब मूळचे कुठले होते याचा तपास पोलिस करत आहेत. तसंच त्यांच्या आत्महत्येमागचे कारण देखील शोधत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.