Ulhasnagar Shocking : उल्हासनगर हादरलं! मध्यरात्री ४ जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, परिसरात खळबळ

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये चौघांना जिंवत जाळण्याचा प्रयत्न झाला. जिंवत जाळण्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
ulhasnagar Crime News
Crime Newssamm tv
Published On

उल्हासनगर शहरात मध्यरात्री घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ३ मधील शास्त्रीनगर येथील एटीपी हिंदी हायस्कूलच्या शेजारी एका माथेफिरूने थेट ४ जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

ulhasnagar Crime News
Mumbai Local Train Mega Block : मुंबईत रविवारी ५ तासांचा मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उल्हासनगरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री काही मित्र मद्यपान करत असताना अचानक रोहन यादव उर्फ बंटी हा युवक घटनास्थळी पोहचला. काहीही न सांगता त्याने चारही जणांवर पेट्रोल ओतले आणि माचीस पेटवत एक भयावह दृष्य निर्माण केले. त्यातील पेटती माचीस ऋषी गुप्ता या युवकावर पडली. या हल्ल्यात ऋषी ३० ते ४० टक्के भाजला गेला. त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

ulhasnagar Crime News
Saturday Horoscope : दवाखान्यावर खर्च होणार, मित्रांच्या चुका माफ करणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, जाणून घ्या

या प्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पेट्रोल टाकणारा बंटी आणि त्यामुळे जखमी झालेला ऋषी हे दोघेही एकाच गावातील आहेत. जखमीच्या आईने पोलीस ठाण्यात आम्हाला गुन्हा दाखल करायचा नाही,असे लिहून दिल्याने या प्रकरणी तक्रार दाखल नसल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी म्हटले.

ulhasnagar Crime News
10 rupees snacks : मद्यप्रेमींना आवडतो १० रुपयांचा 'हा' चकणा; वर्षभरात जवळपास १०००० कोटींचा व्यवसाय

नेमकं काय घडलं?

४ मित्र मद्यपान करत होते. त्याचवेळी रोहन नावाचा युवक आला. त्याने चार जणांवर पेट्रोल ओतलं. त्यानंतर माचीस पेटवली. रोहनच्या हातातील माचीस ऋषीच्या अंगावर पडली. या घटनेत ऋषी ३० ते ४० टक्के भाजला गेलाय. या घटनेत भाजला गेलेल्या ऋषीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com