10 rupees snacks : मद्यप्रेमींना आवडतो १० रुपयांचा 'हा' चकणा; वर्षभरात जवळपास १०००० कोटींचा व्यवसाय

10 rupees snacks for alcoholics : मद्यप्रेमी १० रुपयांचा चकणा खाण्यास पसंती दर्शवतात. या पदार्थाचा जवळपास १०००० कोटींचा व्यवसाय होतो.
10 rupees snacks
10 rupees snacks for alcoholicsSaam tv
Published On

मद्यप्रेमींच्या टेबलावर चकण्याला अनेक वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतात. काही मद्यप्रेमी चकण्यावर हजारो रुपये खर्च करतात. तर काही जण अवघ्या १० रुपयांचा चकणा देखील विकत घेतात. याच मद्यप्रेमींच्या टेबलावर एक १० रुपयांचा पदार्थ देखील आवर्जुन पाहायला मिळतो. देशात याच १० रुपयांच्या चकण्याचा कोटींचा व्यवसाय होतो.

तळीरामांच्या चकण्यामध्ये पापड, सॅलड, पनीर, तळलेले पदार्थ यांचा समावेश असतो. भारतातील मद्यप्रेमी खारे शेंगदाणे देखील चकणा म्हणून खाणे पसंत करतात. अनेक बड्या कंपन्या बंद पाकिटात १० रुपयांच्या शेंगदाण्याची विक्री करतात. अनेक मद्यप्रेमी चकणा म्हणून खारे शेंगदाणे खरेदी करताना दिसतात.

10 rupees snacks
Mumbai Local Train Mega Block : मुंबईत रविवारी ५ तासांचा मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

भारतात भुईमुंगाची शेती भारतातील अनेक राज्यात केली जाते. भुईमुंगांचं उत्पादन हे गुजरात,राजस्थान, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यात अधिक प्रमाणात होतं. काही राज्यात भुईमुंगाची शेती ही खरीफ हंगामात केली जाते. तर काही भागात भुईमुंगाची शेती ही रब्बी हंगामात केली जाते. भुईमुंगाच्या पिकातून तेलाची देखील निर्मिती केली जाते.

10 rupees snacks
Raj Thackeray :...तर दुकानं नाही शाळाही बंद करून टाकेन; हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

भारतात बंद पाकिटात (शेंगदाणे, शेव, वेफर्स आदी) या पदार्थांची विक्री केली जाते. या पदार्थांचा वर्षाला जवळपास ४०००० ते ४५००० कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. यामध्ये शेंगदाण्याच्या व्यवसायाचाही मोठा वाटा आहे. शेंगदाण्यांचा जवळपास ८००० ते १०,००० रुपयांचा वार्षिक व्यवसाय आहे. शेंगदाण्यामध्ये मसाला शेंगदाणे, खारे शेंगदाणे आदी. यांचा समावेश होतो.

10 rupees snacks
Orphan Students : अनाथ विद्यार्थ्यांना मोफत व्यावसायिक शिक्षण मिळणार; लाभार्थींसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता? वाचा एका क्लिकवर

भारतात हल्दीराम, बीकानेरवाला, बालाजी, हल्दीराम नागपूर, बिकाजी, लेजेंड स्नॅक्स यांच्यासहित स्थानिक ब्रँडच्या माध्यमातून नमकीनची विक्री केली जाते. या व्यतिरिक्त स्थानिक विक्रेते देखील सुटे किंवा छोट्या छोट्या बंद पाकिटात नमकीनची विक्री करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com