Crime : उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा, संपर्क कार्यालयात लचके तोडले

Ahilyanagar Kiran Kale : शिवसेना उबाठा गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर संपर्क कार्यालयात बलात्काराचा गुन्हा दाखल, पोलीस कोठडीत चौकशी सुरू.
UBT Shiv Sena leader Kiran Kale Rape Case
UBT Shiv Sena city president Kiran Kale arrested after rape complaint in contact officeSaam TV News Marathi
Published On

सुशील थोरात, अहिल्यानगर प्रतिनिधी

Ahilyanagar Kiran Kale, rape case : अहिल्यानगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे शहर प्रमुखावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेला आहे. संपर्क कार्यलयातच बलात्कार झाल्याची तक्रार महिलेने केली. महिलेच्या फिर्यादीवरून 1860 चे कलम 376(1) 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनाला हा मोठा हादरा मानला जात आहे. आधीच पक्षात गळती सुरू असताना शहर प्रमुखावर गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशी करण्यात येत आहे. (Rape case against Uddhav Thackeray’s Shiv Sena leader Kiran Kale in Ahilyanagar)

अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण गुलाबराव काळे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात एकवीस वर्षीय विवाहित महिलेने गुन्हा दाखल केला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून 1860 चे कलम 376(1) 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला आणि तिचा पती यांच्यात सतत होणारे वाद आणि त्यातून मदत मिळण्याकरिता पीडिता आणि शहर प्रमुख किरण काळे संपर्कात आले होते. (Ahilyanagar police arrest UBT Shiv Sena leader over rape allegations)

UBT Shiv Sena leader Kiran Kale Rape Case
Manikrao Kokate : खेळ मांडला! कृषिमंत्री माणिकराव कोकाटे देणार राजीनामा? तारीख ठरली

पीडित महिलेला मदत करण्याचे आमिष दाखवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी बलात्कार केला. 2023 ते 2024 पर्यंत किरण काळे याने स्वतःच्या संपर्क कार्यालयात बलात्कार केला. तसेच ही गोष्ट कोणाला कळली तर जीवे मारण्याची धमकी किरण काळेकडून देण्यात येत होती. कोतवाली पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुख किरण काळे यांना ताब्यात घेतले. किरण काळे यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

UBT Shiv Sena leader Kiran Kale Rape Case
Chaddi Gang Video : सोलापुरात चड्डी गँगची दहशत, साखर झोपेत असताना साधतेय डाव, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com