prisoner charged for hitting police in wardha  saam tv
क्राईम

Wardha Crime News : वर्धा जिल्हा कारागृहात कैद्याची हवालदाराला मारहाण, गुन्हा दाखल

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News :

कारागृह अधीक्षकांना भेटू दे म्हणत कैद्याने कर्मचाऱ्यास मारहाण केल्याचा प्रकार वर्धा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात घडला. या प्रकरणी कैद्यावर वर्धा शहर पोलिस ठाण्यात (wardha city police station) गुन्हा दाखल झाला आहे. वर्धा शहर पाेलिस तपास करीत आहेत. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार वर्धा कारागृह अधीक्षकांना भेटण्याचा तगादा लावत न्यायदीन बंदीवानाने थेट कर्तव्यावर असलेल्या हवालदाराशी धक्काबुक्की केली. त्यास मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. (wardha latest marathi news)

न्यायदीन बंदीवानाचे नाव रेहमत खान हबीब खान पठाण (रा. हिंगणघाट) असे आहे. ताे जिल्हा कारागृहात बंदीस्त आहे. कारागृहातील हवालदार बॅरेक क्रमांक ७ येथे कर्तव्यावर असताना आरोपी न्यायदीन बंदीवान रेहमत पठाण याने हवालदाराला कारागृह अधीक्षकांना भेटण्याची विनंती केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हवालदाराने पहिले भत्ता घे, साहेब राऊंडवर गेलेले आहे. राऊंड झाल्यावर भेटायला पाठवतो, असे त्यास सांगितले. मात्र, न्यायदीन बंदीवान रेहमत पठाण याने आत्ताच भेटायचे आहे असा तगादा लावत हवालदाराच्या कानशिलात लागावून धक्काबुक्की करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.

याप्रकरणी पोलिस हवालदाराने थेट याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी कारागृहात जात पंचनामा करुन न्यायदीन बंदिवान रेहमत पठाण (रा. हिंगणघाट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : थेट घरात घुसून महिलेवर अत्त्याचार; सुसंस्कृत पुण्यात पोलिसांचा धाक संपला?

उपमुख्यमंत्र्याच्या पोरानं कायदा मोडला; RTO ने पकडला, ७ हजारांना भुर्दंड!

Marathi News Live Updates : शरद पवार गटाकडे 1652 इच्छुकांचे अर्ज, देवळालीतून 62 सर्वाधिक इच्छुक

NABARD Recruitment 2024 : १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजर रुपये पगार अन् बँकेत नोकरी, आजच अर्ज करा

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

SCROLL FOR NEXT