crime news x
क्राईम

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

Crime News : बायकोशी अनैतिक संबंध असल्याच्या रागात एका व्यक्तीने गावच्या जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Yash Shirke

  • संशयातून एका व्यक्तीने चार वर्षांच्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली.

  • आरोपीला पत्नीचे मुलाच्या वडिलांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, त्यातूनच त्याने हे क्रूर कृत्य केले.

  • गंभीर जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Shocking : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एका व्यक्तीने चार वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला. या मुलाच्या वडिलांचे आणि आरोपीच्या पत्नीचे अवैध संबंध असल्याचा आरोपीला संशय होता. या क्रूर घटनेची माहिती मिळताच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्या लहान मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथे घडली आहे. गौरीचक पोलीस स्टेशन परिसरातील सोहागी गावात रक्षाबंधनाच्या दिवशी आजोळी आलेल्या मुलासोबत हे क्रूर कृत्य करण्यात आले आहे. हा मुलगा मूळचा मसौरीच्या धनरुआ ब्लॉक येथे त्याच्या कुटुंबासह राहतो. या चार वर्षीय मुलाच्या वडिलांचे आपल्या पत्नीशी अनैतिक संशय असल्याचा संशय आरोपी गुड्डू पासवानला होता. या संशयावरुन आरोपीने लहान मुलाला लक्ष्य केले.

पोलिसांनी दिलेल्या माहिताप्रमाणे, आरोपी गुड्डू पासवानने मुलाला घरी बोलावले. ब्लेडने लहान मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला. या घटनेमध्ये आरोपीच्या पत्नीचा सहभाग उघड झालेला नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी पीडित मुलगा त्याच्या आईसोबत आजोळी आला होता. तेव्हा आरोपीने मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवत घरी नेत क्रूर कृत्य केले.

आपल्या बायकोशी मुलाच्या वडिलांचे प्रेमसंबंध असल्याचा आरोपीला संशय होता. या संशयात द्वेषाने भरलेल्या आरोपीने बदला घेण्यासाठी चार वर्षांच्या लहान मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापले. मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोक जमले. मुलाला उपचारासाठी पीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला ब्लेड देखील जप्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: जालन्यातील बदनापूर तालुक्यातील पाडळी शिवारात मुसळधार पाऊस

Maharashtra Government: सरकार शेतकऱ्यांना देणार गुड न्यूज: मुख्यमंत्री लवकरच पूर्ण करणार राज्यातील बळीराजाची मोठी मागणी

Mumbai Local: मध्य रेल्वेला पावसाचा फटका, लोकलसेवा उशिराने; घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल

थँक्स माय फ्रेंड! रशियाच्या पुतिन यांच्या फोननंतर PM मोदींनी मानले आभार, ट्रम्प काय म्हणाले सगळं काही सांगितलं!

Crime : कानशिलात लगावल्याने बायको भडकली, रागाच्या भरात नवऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

SCROLL FOR NEXT