Unknown Persons Killed Youth Saam Tv
क्राईम

Nashik Crime: धक्कादायक! पोट भरण्यासाठी आलेल्या नेपाळी तरूणाची सातपूरमध्ये हत्या, नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण

Unknown Persons Killed Youth: नाशिकच्या सातपूर भागामध्ये एका १९ वर्षीय तरूणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. सातपूरमधील कामगार नगर भागातील हॉटेलमध्ये हा तरूण काम करत होता.

Rohini Gudaghe

तबरेज शेख साम टीव्ही, नाशिक

Nashik Crime News

नाशिकच्या (Nashik) सातपूर भागामध्ये एका १९ वर्षीय तरूणाची हत्या झाल्याची घटना घडली (Unknown Persons Killed) आहे. हा तरूण सातपूरमधील कामगार नगर भागातील हॉटेलमध्ये काम करत होता. मृत तरूण मूळचा नेपाळमधील असल्याची समोर आलं आहे. तो नाशिकमध्ये पोट भरण्याच्या निमित्ताने आल्याची माहिती मिळत आहे.  (Latest Crime News) ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

नाशिकच्या सातपूर भागातील (Satpur area) कामगारनगर परिसरामध्ये एका हॉटेल कामगाराची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना (Nashik Crime) घडली आहे. महेंद्र सिंग, असं हत्या झालेल्या तरूणाचं (Nashik Crime) नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस कसुन तपास करत आहे. त्याची तिक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याचं समोर आलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कामगार नगर परिसरात असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ 19 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. महेंद्रसिंग हा मूळचा नेपाळ असल्याची माहिती मिळत (Unknown Persons Killed Youth) आहे. हत्येच्या घटनेमुळे परिसरामध्ये घबराटीचं वातावरण आहे. हत्येचं कारण अस्पष्ट आहे. पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत.

अकोल्यातील घटना

अकोल्यामध्ये एका व्यक्तीची गाढ झोपेत असतानाच लाठीकाठी आणि कुऱ्हाडीनं वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या बटवाडी गावात ही घटना घडली (Crime News) आहे. बटवाडी गावात सरकारी जागेवर कब्जा करण्यासाठी तीन कुटुंबीयात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे.

हा वाद काल रात्री इतका विकोपाला गेला की, रात्री साडेअकरापर्यंत त्यांचा शाब्दिक वाद सुरू होता. थेट मध्यरात्रीनंतर दुसऱ्या कुटुंबातील काहींनी आखरे कुटुंबातील एका व्यक्तीला संपवलं आहे. दरम्यान या प्रकरणात बाळापुर पोलिसांनी आतापर्यंत (crime) दहा लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पुढील तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT