Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात कोणते बदल केले पाहिजेत, कोणत्या पदार्थ्यांचे सेवन केले पाहिजे आणि कोणते टाळावे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
आहारात मूग, मटकी, चणे, मसूर कडधान्य आणि डाळी खा यामुळे शरीराला आवश्यक ते प्रोटिन्स मिळतात.
हिरव्या पालेभाज्या आणि फळे आहारात घ्या. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ राहते.
पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस, ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी आणि ओट्सचे सेवन करा.
भिजवलेले बदाम, अक्रोड, फ्लेक्स सीड्सआणि चिया सीड्स हे हेल्दी फॅट्स खा.
साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ जसे की कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस, केक, पेस्ट्री आणि मिठाई वजन वेगाने वाढवतात.
बेकरी प्रॉडक्ट्स, व्हाईट ब्रेड, पास्ता आणि नूडल्स पचायला जड असतात आणि ते थेट चरबीच्या स्वरूपात साठतात.
समोसे, भजी, चिप्स, पिझ्झा आणि बर्गर फास्टफूड खाणे टाळा. दारू आणि धुम्रपान करणे टाळा.