Crime News: उत्तराखंडमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडांची पुनरावृत्ती; लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये भरून जंगलात फेकला

Live In Partner Killed Girlfriend: उत्तराखंडमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडांची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं आहे. प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह जंगलात फेकला. तीन महिन्यानंतर या घटनेचा खुलासा झाला आहे.
Live In Partner Killed Girlfriend
Live In Partner Killed GirlfriendYandex

Uttarakhand Crime News

उत्तराखंडमधील (Uttarakhand) डेहराडूनमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणासारखं एक प्रकरण समोर आलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या तरुणीची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या (Live In Partner Killed Girlfriend) केली. त्यानंतर त्याने मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून जंगलात फेकून दिला. या प्रकरणात आरोपी प्रियकराला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीने तीन महिन्यांपूर्वी म्हणजे डिसेंबर २०२३ मध्ये ही हत्या केली होती.   (Latest Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २९ जानेवारी रोजी शहरुल नावाच्या महिलेने हरिद्वारच्या पटेल नगर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. या महिलेने तिची २४ वर्षांची मुलगी शहनूर गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता (Killed Girlfriend) असल्याचं सांगितलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक दिवसांपासून मुलीचा शोध लागला नव्हता. त्यानंतर पोलिसांना डेहराडूनमधील अशरोरी जंगलामध्ये एक सुटकेस सापडली. या सुटकेसमधून दुर्गंधी येत होती. पोलिसांनी सुटकेस उघडली असता त्यामध्ये एक कुजलेला मृतदेह आढळून (Crime News) आला. मृतदेहाची ओळख पटवणं कठीण झालं होतं. शवविच्छेदन केल्यानंतर तो मृतदेह हरिद्वारमधील पटेल नगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आलेल्या मुलीचा असल्याचं निष्पन्न झालं.

डेहराडून आणि हरिद्वार पोलिसांनी एकत्र येऊन या प्रकरणाचा पुढील तपास केला. ही हत्या २३ वर्षीय रशीदने केल्याचे उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी रशीदला (Live In Partner)तात्काळ अटक केली. चौकशीमध्ये त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. त्याने पोलिसांना सांगितलं की, तो बागोवलीमध्ये दुचाकी दुरुस्तीचं काम करत होता. आरोपीची २०१७-१८ मध्ये शहनूरसोबत मोबाईल फोनवरून ओळख झाली होती. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. सप्टेंबर २०२३ मध्ये तो शाहनूरला भेटण्यासाठी डेहराडूनला आला. त्यानंतर ते दोघे एकत्र राहू लागले.

Live In Partner Killed Girlfriend
Sambhajinagar Crime : वेब सिरीज पाहून आखला चोरीचा डाव; अवघ्या २० मिनिटात २० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

शहनूरने त्याला ब्युटी पार्लरमध्ये काम करत असल्याचं सांगितलं होतं. पण पण पत्ता विचारल्यावर ती नेहमी टाळायची. शहनूर अनेकदा रात्री उशिरा तर कधी दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीवर (Shraddha Walker Case) यायची. त्यामुळे रशीदला शहनूरचे इतर कुणाशी तरी संबंध असल्याचा संशय आला. 27 डिसेंबर रोजी ती पहाटे दोन वाजता खोलीवर आली. त्यामुळं त्यांच्यात भांडण झालं. भांडणादरम्यान शहनूरने त्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे संतापलेल्या रशीदने शहनूरचा गळा दाबून खून केला.

घटनेनंतर आरोपीने शहनूरच्या एटीएम कार्डमधून १७ हजार रुपये काढले. त्यानंतर त्याने लाल रंगाची मोठी सुटकेस विकत घेतली. मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून जंगलात फेकून (Killing Case0 दिला. यानंतर पकडले जाण्याच्या भीतीनं तो शहनूरची स्कूटर त्याच्या बागोवाली मुझफ्फरनगर या गावी घेऊन गेला. तेथून पानिपत येथे बहिणीच्या घरी गेला. ३० मार्च रोजी तो डेहराडूनच्या खोलीतून सामान घेण्यासाठी आला, तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com